मुंबई : महागाईच्या मुद्द्यावरून भारतामध्ये प्रत्येक निवडणुकीचा विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतात. खोटी आश्वासनं देतात आणि मतं बळकावू पाहतात. इथं महागाईमुळं आगडोंब माजलेला असतानाच संपूर्ण जगात काही असेही देश आहेत जिथं असणारी महागाई आपल्याला धक्काच देईल. तेथील वस्तूंचे दर पाहता आपल्या देशात परिस्थिती बरीच चांगली आहे, असं तुम्ही म्हणाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला, पाहूया जगातील हे महागडे देश आहेत तरी कोणते... 


स्वित्झर्लंड- निसर्गसौंदर्य आणि नानाविध प्रकारच्या चॉकलेस्ट्ससाठी ओळखला जाणारा स्वित्झर्लंड हा देश महागड्या देशांच्या यादीत येतो. इथं स्वत:च्या घरात राहण्यासाठीही कर द्यावा लागतो. 


रेस्तराँपासून अंगावरील कपड्यांपर्यंत इथं सर्वकाही फारच महाग. 



आइसलँड - निसर्गाच्या अगाध लीला पाहण्यासाठी हा देश म्हणजे एक उत्तम पर्याय. इथं उलटं आहे, इथं घर उभं करणं इतकं महाग नाही जिका इथल्या खाण्याच्या आणि वाणसामानाचा खर्च आहे. 


खाण्याचे अनेक पदार्थ इथं इंपोर्ट केले जात असल्यामुळं ही परिस्थितीची ओढावल्याचं कळतं. 



नॉर्वे- हा एक असा देश आहे जिथली महागाई पाहून तुमच्या भुवया उंचावतील. इथं 25 टक्के वॅट भरावा लागतो. खाण्यापिण्याच्या पदार्थांवर 15 टक्के करही भरावा लागतो. 


इथं इतकी महागाई आहे, की काही लोकं सीमेपलीकडून खरेदी करण्याला प्राधान्य देतात. 



बरम्यूडा- महागाई आणि जगण्याच्या शैलीमध्ये बरम्यूडा अमेरिकेलाही तगडी टक्कर देतो. 



डेन्मार्क - जगातील सर्वोत्तम रेस्तराँसाठी डेन्मार्क अतिशय लोकप्रिय देश आहे. इथं एक वेळच्या संपूर्ण जेवणासाठी अर्थात थ्री कोर्स मिलसाठी 6800 रुपये इतकी किंमत मोजावी लागते. 


इथली जीवनशैली हेवा वाटण्याजोगी असली तरीही यासाठी तुम्हाला खर्च अमाप करावा लागणार यात वाद नाही. 



लक्झमबर्ग- जगातील 85 टक्के शहरांपैकी लक्झमबर्ग सर्वात महाग आहे. इथं अनेकजण खरेदीसाठी फ्रान्स गाठतात. कारण तिथं दूधापासून मांस आणि प्रत्येक लहानमोठी गोष्ट इथल्या तुलनेत कमी दरात उपलब्ध आहे.