Guinness World Records मध्ये या French Friesची नोंद, असं काय आहे यात?
भारतातील तरुण मंडळींसाठी फ्रेंच फ्राईज म्हंटलं की, तो त्यांचा जीव की, प्राण आहे.
लंडन : भारतीय लोकंना वेस्टर्न कल्चर स्वीकारायला आणि तसं जगायला फार आवडते. त्यात वेस्टर्न फूड म्हटलं की कोणाला ते खायला आवडणार नाही, त्यासाठी तर आपण पैसे खर्च करुन महागड्या हॉटेलमध्ये ते खाण्यासाठी जातो. परंतु मुळचं वेस्ट पदार्थ असलेला फ्रेंच फ्राईज तसा आपल्याला सगळ्या ठिकाणी खाण्यासाठी उपलब्ध असतो कारण तो तसा फारसा महाग नाही किंवा ते बनवण्यासाठी फारशी काही सामग्रीही लागत नाही. त्यामुळे तो कमीत कमी 50 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत सगळीकडे उपलब्ध असतो.
भारतातील तरुण मंडळींसाठी फ्रेंच फ्राईज म्हंटलं की, तो त्यांचा जीव की, प्राण आहे. परंतु जर तुम्हाला एका फ्रेंच फ्राईजची किंमत सांगितली तर तुमचे डोळे विस्फारतील आणि तुमच्या चेहऱ्याचा रंग उडेल कारण एवढ्या पैशात तर तुम्ही एक मोबाईल विकत घेऊ शकता.
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये दोन शेफने मिळून जगातील सर्वात महागडा फ्रेंच फ्राय बनवला आहेत. शेफने फ्रेंच फ्राईजच्या या डिशला "क्रेम डी ला क्रेम पोम्मे फ्रिट्स" असे नाव दिले आहे. ही डिश सर्वात महाग असल्याने या फ्रेंच फ्राईजचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डॉट कॉममध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमध्ये असलेल्या Serendipty3 रेस्टॉरंटमध्ये काम करणारे शेफ जो आणि शेफ फ्रेड्रिक यांनी जगातील सर्वात महागडा फ्रेंच फ्राय बनवला आहे.
जगातील सर्वात महागडी फ्रेंच फ्राईज डिश तयार करण्यासाठी त्याने शेपवर चिपरबेक आलू, लेब्लांक फ्रेंच शैम्पेन, डोम पेरिगनन शैम्पेन, विनेगर, ग्वेरांड ट्रफल नमक, ट्रफल ऑयल, इटली में बनी चीज़, ट्रफल बटर, ऑर्गेनिक A2 ग्रास फेड क्रीम आणि खाण्यायोग्य गोल्ड पावडर वापरं असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या फ्रेंच फ्राईची किंमत 200 यूएस डॉलर म्हणजेच सुमारे 14 हडार 922 रुपये आहे. ज्यामध्ये तुम्ही एक मोबाईल विकत घेऊ शकता. ही एक क्लासिक अमेरिकन डिश आहे. गिनीज बुकमध्ये फ्रेंच फ्राईचे नाव नोंदवल्यानंतर शेफ फ्रेड्रिक आणि शेफ जो खूप खुश आहेत.
शेफने सांगितले की, जेव्हा त्याने फ्रेंच फ्राईज डीश बनवून ती विक्रीसाठी ठेवली तेव्हा एका ग्राहकाने त्यांना यासाठी त्वरित 200 यूएस डॉलर्स म्हणजे सुमारे 14 हजार 992 रुपयात विकत घेतले. ज्यानंतर त्या डिशचे नाव जगातील सर्वात महागड्या फ्रेंच फ्राईज म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.