घर की सोन्याची खाण, जगातील सर्वात महागडं पॅलेस तुम्ही पाहिलंय का? भाडं ऐकून बसेल धक्का
जगातील सर्वात महागडं घर, नुसतं भाडं वाचूनच फुटेल घाम, FD, RD सगळं मोडलं तरी पैसे पुरणार नाहीत...
ब्रिटन : भाड्याने घर घेणं म्हणजे पोटात आधी गोळा येतो. मात्र असं एक घर आहे ज्याचं नुसतं भाड ऐकून घाम फुटेल आणि डोळे विस्फारतील. आपली एफडी, आरडी आणि बचतीचे पैसे मोडले तरी या घराचं भाडं भरता येऊ शकणार नाही. एवढं महागडं घर आहे कुठे? त्याची खासियत काय? याबद्दल जाणून घेऊया.
सेलिब्रेटी किंवा मोठ्या घरात राहणाऱ्या लोकांबद्दल नेहमी अप्रूप असतं. त्याच्या आयुष्याबाबत खूप उत्सुकता असते. आज अशाच एका बड्या कुटुंबाच्या घराबद्दल जाणून घेऊया. हे घर जगातील सर्वात महागड्या घरांच्या यादीमध्ये येतं.
एका अहवालानुसार ब्रिटनमध्ये हे घर आहे. हा राजशाही कुटुंबाचा बंगला आहे. त्यामुळे इथे भरायचं भाडं ऐकलं तरी डोकं बधीर होऊन जाईल एवढी याची किंमत आहे. बकिंघम पॅलेस तिथल्या राजशाही रेसिडेंशियर प्रॉपर्टी आहे.
सध्या हे घर विक्रीसाठी उपलब्ध नाही अशी माहिती मिळाली आहे. या बंगल्याला 775 खोल्या आहेत. हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 1.3 अरब पाउंड्स खर्च करण्याची तयारी हवी असं मॅक्कार्थी स्टोन यांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे.
कोरोनानंतर 10 कोटी पाउंड यामध्ये वाढ झाली आहे. रिटायरमेंट प्रॉपर्टी डेवलेपरच्या मते 2022 मध्ये ब्रिटन शाही संपत्तीची किंमत 3.7 अरब पाउंड आहे. 2019 पासून 46 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ब्रिटनची शाही संपत्ती आणि महाल देशभरात आहे.
एका अहवालानुसार जर राजशाही कुटुंबाने बकिंघम पॅलेज भाड्याने द्यायचं ठरवलं तर त्याचं महिन्याला भाडं 26 लाख पाउंड एवढं असेल. हा आकडा प्रत्येक प्रॉपर्टीच्या जागेनुसार वाढणारा आहे. याशिवाय तिथल्या भौगोलिक स्थितीवरही आधारीत आहे.
अभ्यासासाठी रिव्ह्यू केलेल्या मालमत्तांपैकी कोणतीही मालमत्ता विक्रीसाठी किंवा भाड्याने सध्या उपलब्ध नाही. राजेशाही मालमत्ता ही हाऊस ऑफ विंडसरची वैयक्तिक मालमत्ता नाही. ही यूकेची मालमत्ता आहे, जी ट्रस्ट अंतर्गत चालते. ब्रिटनमध्ये राणीची प्लॅटिनम ज्युबिली साजरी करण्याची तयारी सुरू असताना हे सत्य अभ्यासातून आलं आहे.