जगातील सर्वात महागडा पेन, या किंमतीत मुंबईत बांधू शकता अलिशान बंगला
Most Expensive Pen In World Marathi: एका पेनच्या किंमतीत तुम्ही मुंबईत बंगला बांधू शकता, हे वाचून तुम्हीही आश्चर्यचकित झालात ना? जगातील सर्वात महागड्या पेनांच्या किंमती जाणून घ्या.
Most Expensive Pen In World: शाळा व कॉलेजच्या दिवसात तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पेन वापरले असतील. हल्ली बाजारात विविध प्रकारचे पेन आले आहेत. या पेनांच्या किंमती ही 100 ते 500 रुपयांपर्यंत असतात. मात्र तुम्हाला माहितीये जगात असे मौल्यवान पेन आहेत ज्यांच्या किंती ऐकून तुम्ही चकित व्हाल. यातील एका पेनची किंमत तर तब्बल 500 कोटींपेक्षा जास्त आहे. जगातील सर्वात महागड्या पेनांबद्दल आज जाणून घेऊया.
फुल्गोर नॉकटर्नस (Fulgor Nocturnus)
फुल्गोर नॉकटर्नस नावाचा पेन जगातील महागडा पेनांच्या यादीत सगळ्यात अव्वल आहे. या पेनाची किंमत 8 मिलियन डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांनुसार, या पेनची किंमत 65 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. एका रिपोर्टनुसार, शंघाईमध्ये 2010 मध्ये झालेल्या एका लिलावात हे पेन 8 मिलियन डॉलरमध्ये विकण्यात आलं होतं. या पेनावर सोने आणि हिऱ्याने जडवले असून कोरीव काम करण्यात आले आहेत.
बोहेम रॉयल (Boheme Royal)
बोहेम रॉयल हे खूप मौल्यवान पेन आहे. मोंटब्लँक या लक्झरी पेन निर्मात्या कंपनीने हे पेन तयार केले आहे. बोहेम रॉयल पेन 18 कॅरेट सोन्याचा वापर करु बनवले आहे. याच्या वरील हिश्शावर मौल्यवान हिरे जडवले आहेत. तर, पेनाची रक्कम 1.5 मिलियन डॉलर असून भारतीय रुपयांनुसार या पेनची किंमत 12 कोटी इतकी आहे.
ऑरोरा डायमांटे (Aurora Diamante)
महागड्या पेनांच्या यादीत ऑरोरा डायमांटे या पेनचा नंबर तिसरा येतो. हे पेन खूप खासपद्धतीने तयार करण्यात आलं आहे. पेनवर 30 कॅरेट हिऱ्यांसोबतच प्लॅटिनम बॅरल लावण्यात आलं आहे. या पेनाची किंमत 1.28 मिलियन डॉलर इतकी असून भारतीय रुपयांनुसार या पेनची किंमत 10 कोटींहून अधिक आहे.
1010 डायमंड्स लिमिटेड एडिशन फाउंटेन पेन (1010 Diamonds Limited Edition Fountain Pen)
1010 डायमंड्स लिमिटेड एडिशन फाउंटेन पेन हे 18 कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलं आहे. या पेनमध्ये जवळपास शंभर हिरे जणवण्यात आले आहेत. एक मिलियन डॉलर या पेनाची किंमत आहे. भारतीय रुपयांनुसार 8 कोटींहून अधिक किंमत आहे.