World’s Most Expensive Sandwich: लहान मुले असो किंवा वयस्कर असो सर्वच वयातील लोकांना सँडविच (Sandwich) हा पदार्थ मनापासून आवडतो. ब्रेडच्या दोन स्लाइसदरम्यान भाज्या किंवा मांस किंवा आवडतील त्या गोष्टी टाकून तयार केलेलं सँडविच खाण्यासारखं सुख नाही असं मत असलेले अनेकजण आहेत. सामान्यपणे रस्त्यावरील गाड्यांवर किंवा खाऊ गल्लीमध्ये अथवा एखाद्या हॉटेलमध्येही मिळणाऱ्या सँडविचची किंमत अगदी 15 रुपयांपासून काही शे रुपयांपर्यंत असते. सामान्य लोकही सहजपणे मनात आलं तर सँडविचची ट्रीट स्वत:लाच देऊ शकता इतका हा स्वस्त पदार्थ आहे. मात्र अमेरिकेतील एका शहरामध्ये सँडविच एवढं महाग मिळतं की सर्वसामान्यांना ते विकत घेणं शक्य होतं नाही. 


कुठे मिळतं हे सँडविच?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या सँडविचबद्दल आपण बोलत आहोत ते जगातील सर्वात महागडं सँडविच (Most Expensive Sandwich In World) आहे. ऑडिटी सेंट्रल न्यूज या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार न्यूयॉर्कमधील सेरेनडिपिटी 3 (Serendipity 3) या रेस्तराँमध्ये मिळणारं सँडविच हे जगातील सर्वात महागडं सँडविच (Most Expensive Sandwich) आहे. 'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'नेही (Guinness Book of World Record) या सँडविचची दखल घेतली असून हे सर्वात महागडं सँडविच असल्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सेरेनडिपिटी 3 या रेस्तराँमधील डेझर्स्टला सर्वात महागडं डेझर्ट, हॅमबर्गरला सर्वात महागडं हॅमबर्गर, हॉट डॉगलाही सर्वात महागडा हॉट डॉग हे किताब मिळाले आहेत. इतकच काय तर जगातील सर्वात मोठा वेडिंग केकचा विक्रमही याच रेस्तराँच्या नावे आहे.


काय खास आहे या सँडविचमध्ये?


आता पुन्हा सँडविचबद्दल बोलायचं झालं तर या सँडविचचं नाव क्विंटएसेशियल ग्रिल्ड चीज सँडविच (Quintessential Grilled Cheese Sandwich) असं आहे. या सँडविचमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी या फारच महागड्या आणि दुर्मिळ प्रकारातील आहेत. या सँडविचची किंमत 17 हजार रुपये इतकी आहे. यामध्ये दोन फ्रेंच पुलमॅन शॅम्पेन ब्रेडचा वापर केला जातो. हा ब्रेड डोम पेरिगनन शॅम्पेन आणि खाता येणाऱ्या गोल्ड फ्लेकपासून तयार केला जातो. यामध्ये सफेट ट्र्रफल बटर वापरलं जातं. तसेच कॅसिओकावालो पोडोलिको चीज हा ब्रेड बनवता वापरलं जातं. या साऱ्या गोष्टी फार महाग आहेत. हे सँडविच दक्षिण आफ्रिकन लॉब्स्टर टोमॅटो बिस्क डिपिंग सॉससहीत एका बॅकरेट क्रिस्टल प्लेटमध्ये ग्राहकांना सर्व्ह केलं जातं.



चिज असतं फारच खास कारण...


वरील गोष्टींची यादी वाचूनच हे सँडविच सामान्य नाही याची तुम्हाला कल्पना आली असेल. त्यामुळेच हे सँडविच खायचं असेल तर 48 तास आधी म्हणजेच दोन दिवस आधी यासाठी ऑर्डर द्यावी लागते. या सँडविचची ऑर्डर दिल्यानंतरच त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मागवल्या जातात. यामध्ये जे चीज वापरलं जातं ते खास इटलीवरुन मागवलं जातं. हे चिझ विशेष प्रजातीच्या गाईच्या दुधापासून बनवलं जातं. या प्रजातीच्या गायी वर्षातून केवल दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये दूध देतात. अशाप्रकारच्या केवळ 25 हजार गाया दूध देण्यासाठी ब्रीड केल्या जातात.