9 वर्षाच्या चिमुकल्याची कमाल... अपघातात बेशुद्ध आईसाठी केलं असं काम, तुम्ही देखील त्याची प्रशंसा केल्याशिवाय राहाणार नाही
एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
Viral Video : मुलाचं आणि आईवडिलांचं नातं हे जगात सगळ्यात खास आणि वेगळं असतं. मुलांसाठी आई-वडिल कोणत्याही थराला जाऊ शकतात. असे व्हिडीओ पण आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. तसंच आई-वडिलांसाठी मुलांनी एखाद्या संकटाशी सामना केला असेही काही व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. आज कालची मुलं फार हुशार असतात असं आपण म्हणतो. त्यांना टेक्नोलॉजी फ्रेंडली ते असतात. सतत काही ना काही नवीन शिकण्याची त्यांची उत्सुकता असते. आज कालची मुलं कधी काय चमत्कार करतील हे सांगता येत नाही. असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
बापरे...चक्क चिमुरड्याने आईचा जीव वाचवला!
मीडिया रिपोर्ट्सनुसार एक महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी एका इलेक्ट्रिक सायकलवर गेली होती. अचानक रस्त्यात तिला एका कारने धडक दिली आणि तिचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर ती बेशुद्ध पडली होती. तिच्या कपाळाला मार लागल्यामुळे रक्त वाहत होते. आईला अशा अवस्थेत पाहून या 9 वर्षांच्या मुलगा घाबरला. त्याने आईला उठवण्यासाठी आवाज द्यायला सुरुवात केली. ती उठत नाही हे पाहून, या चिमुरड्याने चक्क आईला CPR देण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील शेजारी असणारे लोक पण या मुलाकडे पाहून अवाक झाले.
शाब्बास रे पट्ट्या!
या अपघातात महिलेला खूप दुखापत झाली होती. आईला शुद्धी आणण्यासाठी मुलाने CPR दिला आणि ती काही वेळात शुद्धीवर आली. हा मुलगा येवढ्यावर थांबला नाही. तर रुग्णवाहिणी येईपर्यंत आईला उन्हापासून वाचवण्यासाठी छत्री घेऊन तो तिच्या शेजारी बसला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ही घटना 19 जुलैला चीनच्या अनहुई प्रांतातील आहे. मुलाच्या बुद्धिमत्तेचं आणि समजूतदारपणाचं सर्वत्र कौतुक होतं आहे.
पालकही झाले अवाक
स्थानिक मीडियाने मुलाच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ''आमचा मुलगा फक्त 9 वर्षांचा आहे आणि आम्ही त्याला कधीही CPR द्यायला शिकवले नाहीत. त्यांची पत्नी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.''