मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचं जुळलं सूत, मुलीला फोन करून दिली प्रेग्नन्सीची बातमी आणि..
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
मुंबई : आई-मुलीचं नातं हे जगातील सर्व नाते सर्वात खास मानले जाते. मात्र, या मुलीची कहाणी ऐकल्यानंतर अनेकांना तिच्या आईचा राग आल्याचं दिसून आलं. या मुलीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून तिची आपबीती सांगितली आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे. मुलीनं तिच्यासोबत झालेला सर्वात मोठा विश्वासघात असल्याचं म्हटलं आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या व्हेनेसानं सांगितलं की, ती सुट्टीसाठी मेक्सिकोला गेली होती. त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड आणि तिची आई दोघेही तिच्या घरी होते. व्हेनेसानं सांगितलं की, जेव्हा तिनं मेक्सिकोहून तिच्या आईला कॉल केला, तेव्हा ती कॉलवरच रडू लागली. काही दिवसांनी कॉल करून आईनं फोनवरच मुलीसमोर हा धक्कादायक खुलासा केला.
जेव्हा आईने तिच्या गरोदरपणाची बातमी मुलीला सांगितली, तेव्हा व्हेनेसा बहीण होणार होती म्हणून आनंदाने उडी मारु लागली. पण मुलीचा आनंद हा काही क्षणासाठी होता. कारण आईनं नंतर सांगितलं की ज्या बाळाला ती जन्म देणार आहे ते बाळ व्हेनेसाच्या बॉयफ्रेंडचं आहे. तेव्हा व्हेनेसाला खूप मोठा धक्का बसला. मुलीला राग आला आणि तिने लगेचच तिच्या आई आणि प्रियकराला ब्लॉक केलं. यानंतर मुलीनं ट्रिप सोडून आपल्या देशात परत येण्याचा निर्णय घेतला आणि व्हेनेसानं तिचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाली.
या मुलीची वेदनादायक कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. लोकांना व्हेनेसाचा बॉयफ्रेंड आणि तिच्या आईवर खूप राग येत आहे. एवढं करूनही प्रियकरानं मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला, पण मुलीनं तिच्या आई आणि प्रियकराला माफ केलं नाही.