Viral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग
Viral News : प्रत्येक आई वडिलांना आपल्या पोरांना आनंदी आणि सुखी पाहायचं असतं. लेकीच्या संसारासाठी आई वडील दिवसरात्र एक करतात. पण एक विचित्र घटना समोर आली आहे. जावय लेकीसोबत हनीमूनला गेलेल्या सासूचं जावयावर जीव जडला अन् मग...
Trending News : प्रेम कधी कोणावर आणि कुठे होईल याची कोणालाही कल्पना नसते. प्रत्येक नात्याची खास असतात आणि त्याची आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा असते. वडील आई यांचं लेकांशी निस्वार्थ प्रेम असतं. त्यांच्या सुखासाठी ते अहोरात्र मेहनत करत असतात. मुलीच्या लहानपणापासून आई वडील तिच्या लग्नांची स्वप्न रंगवत असतात. लग्नानंतर लेक सुखी व्हावी एवढंच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पण सोशल मीडियाच्या जगात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका आईनेच लेकीचा संसार उद्धवस्त केला आहे. सासूचं जावयावर प्रेम जडलं आणि क्षणात प्रत्येक नात्यावरील विश्वास उडाला आहे. (Mother in law and son in law have physical relations got pregnant trending news on Internet)
आईने तोडला लेकीचा संसार
लग्नानंतर जावयाने आपल्या लेकीवर प्रेम करावं तिला जगातील सर्व सुख द्यावं. तिला कायम राणीसारखं ठेवावं आणि तिच्याशी कायम एकनिष्ठ राहावं. आपल्याकडे जावयी म्हणजे मुलगाच असतो. ही विचित्र प्रेम प्रकरण ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. (Love Affair)
आई तू हे केलं...
लॉरेन वॉल ही तरुणी 19 वर्षांची असताना पॉल व्हाइटशी लव्ह मॅरेज केलं होतं. तेव्हा पॉल व्हाइट हा विमानतळावर कामवर होता. लेकीचं लग्न म्हटलं तर आईनेही छान सोहळा केला. लॉरेन वॉल ही आईसोबत एकटीच राहायची. त्यामुळे लग्नानंतर आई कशी राहणार म्हणून तिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तसं तर लग्नानंतर नवरा बायको दोघेच जातं असता. हा त्यांच्यामधील एकदी खासगी आणि रोमँटिक क्षण असतो. जो त्या दोघांना आयुष्यभर जवळ येण्यासाठी महत्त्वाचा असतो. असं असतानाही लेकीने आईला हनीमून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला खरा पण...(honeymoon viral Video)
हनीमून आणि तेही सासू, जावई आणि मुलीचं...तिघेही डेव्हॉनमध्ये दोन आठवड्यांसाठी हनिमूनसाठी गेले होते. तिथे सगळं छान आणि आनंदात सुरु होतं. लेकीसाठी हे क्षण अतिशय सुंदर होते. हनीमून झाल्यावर ते तिघे घरी परतले. आता संसाराला सुरुवात झाली होती. पण कोण जाणे पण हनीमूनवरुन आल्यावर पॉल बदलला होता. आता पॉल आणि लॉरेनमध्ये भांडणं होतं होती. ही भांडणं इतकी टोकाला गेली की लग्नाच्या 8 आठवड्यांमध्येच पॉलने लॉरेनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून लॉरेनच्या सुखी संसारची स्वप्न क्षणात पुसली गेली होती.
नवरा घटस्फोट देणार म्हटल्यावर लॉरेन आईकडे आली. लॉरेनला काही कळतं नव्हतं की पॉलला काय झालं की त्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला. आईशिवाय आता लॉरेनला कोणाचाच आधार उरला नव्हता. रोज एक एक दिवस पुढे जाते होते. पण एक दिवस त्याचा समोर नवरा पॉलचे सत्य समोर आले. तिची आई गर्भवती होती आणि काही दिवसातच तिने एका गोंडस बाळा जन्म दिला होता. वडील नाही की आईचं कोणाशी संबंध नाही मग आई गर्भवती कशी झाली. आता तिला काहीच कळत नव्हतं. यासगळ्या मागील सत्य जेव्हा समोर आल्यानंतर लॉरेनच्या आयुष्यात भूकंप आला.
झालं असं की, जेव्हा लॉरेन आईला घेऊन हनीमूनला गेली होती. तिथे आईचं जावयावर म्हणजे पॉलवर तिचा जीव जडला. तिथे त्या दोघांमध्ये जवळीक साधली. लेकीचा हनीमून बाजूला राहिला. आई आणि जावयाने एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून या बाळाचा जन्म झाला आहे. हे सगळं ऐकून लॉरेनचा नात्यांवरील विश्वासच उडाला. आईच्या या कृत्याने जबर धक्का बसलेल्या लॉरेनने आईला कधी माफ करणार नाही असं सांगितलं.
आज पॉल आणि लॉरेनची आई ज्युली यांनी लग्न केलं असून ते एकत्र सुखी संसार करत आहेत. नवरा आणि आईच्या या विश्वासघातानंतर लॉरेनच्या हृदयावर कायमचा घाव झाला आहे. ज्यात आज तरी औषधं नाही.