पोटच्या मुलीला अस्वला पुढे फेकून निघून गेली आई, कॅमेऱ्यात कैद झालं हे भयानक दृश्य
एका आईने चक्क आपल्याच पोटच्या मुलीला मरणाच्या दारी सोडलं. पण सुदैवाने चिमुकलीचे प्राण वाचले.
मुंबई : उजबेकिस्तानच्या एका प्राणीसंग्रहालयातून एक धक्कादायक घटना पुढे आली. ज्यामध्ये एका आईने आपल्याच पोटच्या मुलीला अस्वला समोर फेकून दिलं आणि तेथून निघून गेली. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झालीये.
Daily Star च्या बातमीनुसार उजबेकिस्तानची राजधानी ताशकंदमधून ही घटना जगासमोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सगळ्यानाच धक्का बसला. कारण एका आईने आपल्याच पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दारी ढकललं.
मुलीला अस्वला जवळ फेकल्यानंतर अस्वल त्या मुली जवळ गेला. पण नंतर सुदैवाने त्याने तिला काहीही केलं नाही. अस्वलाला एका पिंजऱ्याट अडकवल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मुलीला सुरक्षित बाहेर काढलं.
मुलीला फेकल्यामुळे चिमुकलीला काही प्रमाणात दुखापत झाली. पण अस्वलापासून ती सुरक्षित राहिली. ही घटना समोर आल्यानंतर या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. कमीत कमी 15 वर्षांची शिक्षा या महिलेला होऊ शकते.