Viral News:  आई आणि मुलाचं नातं या जगातील सर्वात सुंदर नातं असतं. आई आणि मुलाच्या नात्यासमोर सगळी नाती फिकी पडतात. आई ही एकमेव व्यक्ती असते जी मुलावर निस्वार्थ प्रेम करते. भारतात आई आणि मुलाचं नातं कवितेतून अगदी कांदबरीतूनही खूप सुंदर प्रकारे रेखाटलं आहे. भारतात आईला देवाचं स्थान देण्यात आलं आहे. असं म्हणतात की, देव सगळीकडे येऊ शकत नाही म्हणून त्याने प्रेमळ आईची बनवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण रुसमध्ये अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासला. एक महिला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करु शकते याचं हे उदाहरण. आपण सुंदर दिसावं हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. त्यासाठी त्या सौदर्यं प्रसाधनाचा वापर करतात. काही जणी तर आपल्या चेहऱ्याची सर्जरी पण करु घेतात. पण या रुसमधील महिलेने जे काही केलं ते ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही. 


मात न तू वैरणी 



या महिलेला सुंदर दिसायचे होते, म्हणून या आईने काय करावं. तर या आईने आपल्या 5 दिवसांच्या चिमुरड्याला थेट विकून टाकलं. या निर्दयी आईने आपल्याच पोटच्या गोळ्याला 2 लाख 83 हजारात विकलं. या पैशाचा उपयोग तिने तिचं सौदर्यं निखरण्यासाठी केला. तिने सुंदर दिसण्यासाठी नाकाचं ऑपरेशन केलं. 


घटना कशी उघड झाली?



हे बाळ विकल्यानंतर नवीन घरात ते बाळ आजारी पडलं. त्यामुळे नवीन पालकांनी त्याचा मेडिकल रिपोर्ट या महिलेकडे मागितला. तिने तो देण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी या खोट्या पालकांना अटक केली. या पालकांची चौकशीदरम्यान हा सगळ्या प्रकार समोर आला. तर या निदर्यी आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने 25 एप्रिल 2022 ला एका मुलाला जन्म दिला. तर 30 एप्रिलला तिला हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळाला. तेव्हाच तिने मुलाला विकलं होतं. तिला ठरलेल्या रक्कमापैकी एक हप्ता मिळाला होता. दुसऱ्या हप्ता मिळणार तोपर्यंत पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती.