मुंबई : ब्रिटनचा राजपुत्र प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल उद्या म्हणजेच 19 मेला विवाहबंधनात अडकणार आहेत. ब्रिटनच्या या शाही लग्नाचा सोहळा विंडसर कॅसलच्या सेंट जॉर्ज चॅपल चर्चमध्ये रंगणार आहे. प्रिंस हॅरी आणि मेगनला भारतामधून मुंबईच्या डब्बेवाल्यांनीही खास भेट आणि शुभेच्छा दिल्या आहेत. 


डब्बेवाल्यांनी पाठवल्या खास शुभेच्छा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या डब्बेवाल्यांनी मेगन मार्कलसाठी मराठमोळी पैठणी साडी आणि प्रिंससाठी भगवा फेटा, कुर्ता-पायजमा खरेदी केला आहे. सोबतच  कोल्हापूरचा 'पेठा' देखील खरेदी केला आहे. लग्नाचं सेलिब्रेशन मुंबईत करताना काही सरकारी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना मिठाई वाटली जाणार आहे. 


2003 पासून बनले खास संबंध 


हॅरीचे वडील म्हणजेच प्रिंस चार्ल्स यांच्या लग्नासाठी मुंबईच्या डब्बेवाल्यांना आमंत्रण देण्यात आले होते. 2003 साली प्रिंस चार्ल्स मुंबईच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळेस मुंबईचे डब्बेवाले आणि शाही परिवार यांच्यामध्ये खास नाते बनले होते. मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या कामाच्या स्टाईलवर, चोख मॅनेजमेंटवर खूष होऊन त्यांचे कौतुक केले होते. 


भारताकडून 'बैल' भेट 


ब्रिटनच्या नवदांम्पत्याला लग्नामध्ये भारताकडून 'बैल' गिफ्ट केला जाणार आहे. 'पीटा'  (PETA)इंडियाकडून प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कलला बैल गिफ्ट केला जाणार आहे. या बैलाचं नाव 'मेरी' आहे. प्रिंस हॅरी आणि मेगन सामाजिक कार्याशी निगडीत असतात. हे दोघेही जानवरांच्या रक्षणासाठी काम करतात. 


'मेरी' हा बैल पीटा द्वारा वाचवलेला आहे. सतत जड सामान खेचून या बैलाची स्थिती बिघडली होती. त्यानंतर पीटाने 'मेरी'ला दत्तक घेऊन त्याला वाचवले. सध्या महाराष्ट्रातील एका अभयारण्यामध्ये ठेवले आहे. लंडनमध्ये वातावरण अत्यंत थंड असल्याने 'मेरी'ला गिफ्ट म्हणून तेथे पाठवले जाणार नाही. लग्नाच्या वेळेस या बैलाचा फोटो मेगन आणि प्रिंसला गिफ्ट म्हणून पाठवला जाईल.