Trending News In Marathi: आर्थिक परिस्थिती नसतानाही एका कर्मचाऱ्याने Rolls-Royce कार, महागडी घड्याळे घेतली. कर्मचाऱ्याकडे एका रात्रीत इतके पैसे कुठून आले, असा सवाल उपस्थित होऊ लागला. मात्र, याचा शोध घेतला असता धक्कादायक उलगडा झाला आहे. हा कर्मचारी एका संग्रहालयात काम करतो. तिथेच त्याने एक मोठा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संग्रहालयात एकापेक्षा अनेक सरस आर्टवर्क पाहायला मिळतात. अनेक आर्टवर्क हे लाखो-करोडे रुपयांना विकले जातात. याचाच फायदा या कर्मचाऱ्यांने घेतला आहे आणि एका रात्रीत मालामाल झाला आहे. या कर्मचाऱ्याने संग्रहालयात ठेवलेल्या एका महागडे आर्टवर्क चोरी करुन त्याजागी बनावट पेंटिग ठेवले आहे. या पेंटिगच्यामुळेच तो लखपती बनला आहे. त्याने रोल्स रॉयस कार आणि महागडे घड्याळ खरेदी केले आहे. 


या प्रकरणाचा खुलासा होता कर्मचाऱ्याला दोषी ठरवण्यात आले आहे. हे प्रकरण जर्मनीतील आहे. हा कर्मचारी मे 2016 ते 2018 पर्यंत या ठिकाणी काम करत होता. आता त्याला 21 महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात आले असून त्याच्यावर 60,600 यूरो (जवळपास 52 लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, 30 वर्षांच्या एका कर्मचाऱ्याने Das Märchen vom Froschkönig नावाची खरी पेंटिंग चोरी केली होती. यात फ्रॉग प्रिन्सची गोष्ट सांगण्यात आली होती. पेंटिंग चोरल्यानंतर त्याजागी एक नकली पेंटिंग ठेवण्यात आली होती. त्यानंतर खऱ्या पेंटिंगचा गुपचुप लिलाव करण्यात आला. एका ऑक्शन हाऊसमध्ये हि पेंटिग ठेवण्यात आली होती. 


ऑक्शन हाउसमध्ये या कर्मचाऱ्याने बनावट कहाणी रचून सांगितली होती. हि पेंटिंग माझ्याकडे आजी-आजोबांच्या काळापासून आहे. त्यानंतर जवळपास 70,000 यूरो (61 लाख रुपये) इतक्या किंमतीला विकण्यात आली. यातून कर्मचाऱ्याला 50,000 यूरा (43,000) लाख मिळाले होते. या पैशातून त्याने महागडी कार व घड्याळे खरेदी करुन उरलेल्या पैशातून कर्ज फेडले होते. 


जेव्हा एका सामान्य कर्मचाऱ्याकडे रोल्स रॉयस कार पाहिल्यानंतर अनेकांशी शंका उपस्थित केली होती. त्यानंतर चौकशी करण्यात आल्यानंतर त्याची चोरी पकडली गेली. या कर्मचाऱ्याकडे स्टोअर रुमची जबाबदारी देण्यात आली होती. याचाच फायदा घेऊन त्यांनी तिथेच चोरी केली. त्याने महागड्या पेंटिगबरोबरच तीन आणखी पेंटिंग चोरी केल्या आहेत. त्यातील दोन त्यांनी विकल्या आणि तिसरी विकण्यासाठी जात असतानाच तो पकडला गेला.