COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 


नवी दिल्ली : जीवंत मानसांच्या जगात जगणे महाग आणि मृत्यू किती स्वस्त झाला आहे. असे असले तरी, मनात असलेली जगण्याबद्धलची उर्मी कशी मृत्यूवर मात करते याचे जबरदस्त उदाहरण पुढे आले आहे. नबी हुसेन असे या व्यक्तीचे नाव आहे.


..त्यापूर्वी त्याने समुद्रत पाहिला नव्हता.


म्यानमारमध्ये वारंवार उफाळणाऱ्या हिंसाचारामुळे तेथील स्थानिकांमध्ये स्थलांतरणाचे प्रमाण वाढले आहे. हे स्थलांतरीत मग भारत, बांग्लादेशात निर्वासीत म्हणून प्रवेश मिळवतात. निर्वासीत असलेल्यांपैकी अशाच नबी हुसेनची धक्कादायक कहाणी पुढे आली आहे. नबी हुसेन याचे वय केवळ 13 वर्षांचे आहे. प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तात उल्लेख केल्यानुसार त्याला पोहोता येत नाही. तसेच, म्यानमारमधील आपले गाव सोडण्यापूर्वी त्याने कधीच जवळून समुद्र पाहिला नव्हता. मात्र, मृत्यूवर विजय मिळविण्यासाठी त्याने चक्क समुद्र पार केला. आपल्या या धाडसाबद्दल आज त्याला स्वत:ही विश्वास वाटत नाही.


लाटांवर झाला स्वार...


म्यानमार ते बांग्लादेश असा प्रवास समुद्रमार्गे करणार्या नबी हुसेनला याबाबत विचारले असता तो म्हणतो, 'हा संपूर्ण प्रवास मी समुद्रमार्गे केला. या प्रवासात मला मोलाची साथ लाभली ती एका पिवळ्या रंगाच्या प्लास्टीक कॅनची. समुद्र प्रवासादरम्यान लाटांमागून लाटा माझ्यावर आदळत होत्या. मात्र, मी कॅनवरील पकड मुळीच सुटू दिली नाही. अनेकदा कॅनवरील पकड सुटून आपल्याला जलसमाधी मिळते की काय?, असेही वाटले पण मी हा प्रवासा पूर्ण केला,' असे नबी सांगतो.


मरण पाहिले जवळून


सर्वसामान्या देहशष्टीचा नाबी पुढे सांगतो, 'मृत्यूच्या भीतीने मी पूरता घाबरून गेलो होतो. मला सातत्याने वाटत होते की हा माझा शेवटचा क्षण आहे. पण, तसे घडले नाही. मी आज जीवंत आहे. खरेतर, म्यानमारमध्ये रोहिंग्या गेली अनेक दशकं राहात आहेत. पण, बहुसंख्या बौद्ध आजही त्यांना घुसखोर म्हणूनच पाहतात', असेही तो म्हणतो.


दरम्यान, म्यानमारमध्ये होत असलेल्या हिंसाचाराल कंटाळून देश सोडणाऱ्या नागरिकांची संख्या मोटी आहे. आपली सर्व मुळं सोडून हे लोक भारत, बांग्लादेशात आश्रीत म्हणून पोहोचत आहेत. गेल्याच काही आठवड्यांमध्ये तीन डजनांहून अधिक लोकांनी म्यानमारमधू स्थलांतर केले.