Mysterious island: जगातील सर्वात रहस्यमयी बेट; वर्षातील केवळ एकाच दिवशी तुम्ही देऊ शकता भेट
मुख्य म्हणजे वर्षातून एकदाच या बेटावर जाण्याची परवानगी आहे.
मुंबई : पर्यटनाची आवड असलेल्या लोकांना आयुष्यात एकदा तरी एखाद्या बेटाला भेट देण्याची इच्छा असते. कारण जमिनीपासून दूर समुद्राच्या मधोमध वसलेली ही बेटं नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहेत जिथे फार कमी लोक राहतात, त्यामुळे तिथे ना गर्दी असते ना प्रदूषण. पण जगात अशी अनेक बेटे आहेत जी रहस्यमय बेटं मानली जातात.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका बेटाबद्दल सांगणार आहोत ज्याला नेहमी भेट देता येत नाही. मुख्य म्हणजे वर्षातून एकदाच या बेटावर जाण्याची परवानगी आहे.
रहस्यमयी Eynhallow island
आम्ही स्कॉटलंडमधील आयनहेलो या रहस्यमय बेटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. हे बेट 'दिल'च्या आकारात आहे जे खूप सुंदर आहे, परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वर्षातून फक्त एक दिवस लोकांना याठिकाणी भेट देण्याची परवानगी आहे. उर्वरित 364 दिवस या बेटावर येणं शक्य नाही.
नकाशातही शोधणं कठीण
हे बेट इतकं लहान आहे की ते नकाशावर शोधणं फार कठीण आहे. या बेटाबद्दल अनेक रहस्यमय कथाही चर्चेत आहेत. पौराणिक कथेनुसार, Eynhallow हे भुतांचं बेट आहे.
या बेटावर आत्मे राहत असल्याचा दावा
अनेक कथांप्रमाणए, हे बेट दुष्ट आत्म्यांनी पछाडलेलं आहे. जर कोणी या बेटावर येण्याचा प्रयत्न केला तर हे दुष्ट आत्मे हे बेट हवेत गायब करतात. या बेटावर जलपरी असल्याचाही दावा केला जातो. जे उन्हाळ्यातच पाण्यातून बाहेर पडतात, असंही म्हटलं गेलंय.
असं म्हटलं जातं की, हजारो वर्षांपूर्वीही या बेटावर लोक राहत होते, परंतु 1851 मध्ये याठिकाणी प्लेगचा आजार पसरला, ज्यामुळे येथे राहणारे लोक बेट सोडून गेले. आता हे बेट पूर्णपणे ओसाड पडलेत. अनेक जुन्या इमारतींचे ढिगारे याठिकाणी सापडलेत. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते, याठिकाणी उत्खननात अनेक पाषाणयुगीन भिंती देखील सापडल्या आहेत.