मुंबई : जगभरात अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, ज्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातात. अशीच एक जागा तुर्कीच्या हिरापोलिस शहरात आहे. येथे असलेल्या एका मंदिराला अशुभ मानले जाते. कारण या मंदिरातून नरकाकडे जाण्याचा मार्ग आहे असे म्हणतात. ज्यामुळे या मंदिराला नरकाचे द्वार असे ही म्हणतात. येथील लोकांची अशी समजूत आहे की, मंदिराजवळ जो जातो तो मरतोच. इतकंच नाही तर असं म्हटलं जातं की, एकदा कोणी या मंदिरात प्रवेश केला की, त्या व्यक्तीचा मृतदेह देखील सापडत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ScienceAlert.com नुसार, गेल्या अनेक वर्षांपासून येथे गूढ मृत्यूच्या घटना घडत आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिराच्या संपर्कात येणारा माणसूच नाहीतर प्राणी देखील जिवंत राहात नाही. यामुळेच लोक याला 'द गेट ऑफ हेल' असं म्हणतात.


ग्रीक देवाचा विषारी श्वास मृत्यूचं कारण!


इथल्या लोकांमध्ये अशीही एक समजूत आहे की, ग्रीक देवाच्या विषारी श्वासामुळे येथे लोक मरण पावतात. ग्रीको-रोमन काळात मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचा शिरच्छेद केला जात असे.



परंतु शास्त्रज्ञांनी या रहस्यावरून पडदा उचलला आहे


दुसरीकडे, वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या खालून सतत विषारी कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो. यामुळेच मानव, प्राणी, पक्षी यांचा संपर्क येताच त्यांचा मृत्यू होतो.


शास्त्रज्ञांना मंदिराखालील गुहेत मोठ्या प्रमाणात CO2 सापडले आहे. साधारणपणे, फक्त 10 टक्के कार्बन डाय ऑक्साईड 30 मिनिटांत एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतो, परंतु मंदिराच्या गुहेत विषारी वायूचे प्रमाण 91 टक्के आहे. त्यामुळेच येथे येणारे कीटक, कीटक, प्राणी, पक्षी याच्या संपर्कात येताच आपला जीव गमावतात.