मुंबई : जगात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यावर लोकांचा विश्वास बसत नाही. या गूढ घटना आजही मानवासाठी एक गूढच आहेत. 2016 मध्येही अशीच एक घटना घडली होती. जेव्हा इजिप्त एअरलाइन्सचे विमान आकाशात गायब झालं होतं. मुख्य म्हणजे, हे विमान लँड होण्याच्या वीस मिनिटं अगोदरचं बेपत्ता झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेपत्ता झालेल्या या विमानाचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. इजिप्त एअरलाइन्सच्या विमान एअरबस-320 ने इजिप्तमधील कैरो विमानतळासाठी उड्डाण केलं, जे जगातील अत्याधुनिक विमानतळांमध्ये समाविष्ट आहे.


या विमानात एकूण 66 प्रवासी होते. मात्र हे विमान लँडिंगपूर्वीच आकाशात गायब झालं. या गूढ घटनेला इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही या विमानाचा शोध लागलेला नाही. इतकंच नाही तर विमानाचे अवशेष किंवा कोणत्याही प्रवाशाचा मृतदेह देखील जवळच्या परिसरात सापडला नाही. 


इजिप्त एअरलाइन्सचे प्रवासी विमान Airbus-320 पॅरिसहून कैरो, इजिप्तसाठी 18 मे 2018 रोजी उड्डाण केलं होतं. या प्रवासात विमानाला चार तास लागले असते, पण तीन तास 40 मिनिटांच्या उड्डाणानंतर विमान अचानक गायब झालं.


लँडिंगच्या केवळ वीस मिनिटं आधी विमानाचा एटीसीशी संपर्क तुटला. विमानाशी पुन्हा संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले, परंतु प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाला. शेवटी, हे विमान अतिरेक्यांनी अपहरण केलं असावं, असा अंदाज आहे. मात्र, याबाबतही कोणते संकेत मिळाले नाहीत.


इतकंच नाही तर, हे विमान कुठेतरी कोसळले असावं, असा विश्वास पुन्हा व्यक्त करण्यात आला. याबाबत पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. अनेक महिने आणि अनेक देशांमध्ये विमानाचा शोध सुरू होता, पण त्यावेळी काहीही सापडलं नाही.


विमानात 56 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्ससह एकूण 66 लोक होते. जहाज 20 मिनिटांत आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचणार होतं, पण अचानक ते रडारच्या बाहेर गेलं. यानंतर या जहाजाशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु सर्व अपयशी ठरलं.