Namira Salim : भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर चित्र विचित्र प्रतिक्रिया देत पाकिस्तानने स्वत:चे हसू करुन घेतले. मात्र, जे पाकिस्तान सरकार करू शकलं नाही ते पाकिस्तानतील एक महिला करणार आहे.  नामिरा सलीम नावाची महिला  स्वखर्चावर अंतराळवारी करणार आहे. अंतराळवारी करणारी ती देशातील पहिली महिला ठरणार आहे. 


कंगाल झालेल्या पाकिस्तानातील महिलेची गगनभरारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान हा देश सध्या भिकेला लागला आहे. अनेक देशांकडून कर्ज घेवून हा देश जगत आहेत. अशातच पाकिस्तानच्या नामिरा सलीम या गगनभरारी घेणार आहेत.  नामिरा सलीम या अंतराळवारी करणाऱया देशातील पहिल्या महिला आहेत. त्याच्या या आंतराळ मोहिमेसाठी पाकिस्तान सरकार किंवा त्याच्या स्पेस एजन्सीचे कोणतेही योगदान असणार नाही. नामिरा सलीम या स्वखर्चाने अंतराळाची सफर करणार आहेत. 


स्पेस फ्लाइटने अंतराळाची सफर करणार


नामिरा सलीम या स्पेस फ्लाइटने अंतराळाची सफर करणार आहेत. त्यांनी सोशल मिडियाद्वारे त्यांच्या या मोहिमेबद्दल माहिती दिली आहे.  नामिरा वर्जिन गॅलेस्टिकच्या स्पेस फ्लाइटने अंतराळाची सफर करणार आहेत. 5 ऑक्टोबरला  हे स्पेस फ्लाइट उड्डाण करणार आहे. यात नमिरा यांच्याशिवाय इतर दोन अंतराळवीर देखील असणार आहेत.  अमेरिकेचे रॉन रोसानो आणि यूकेच्या ट्रेव्हर बीटी यांचा समावेश आहे. अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकचे हे पाचवे आणि नववे उड्डाण असेल.


स्पेस क्राफ्ट आणि स्पेस फ्लाइट यांच्यात काय फरक? खर्च किती येतो?


स्पेस क्राफ्टपेक्षा  स्पेस फ्लाइट वेगळ्या असतात. स्पेस क्राफ्टमध्ये रॉकेटमाध्यमातून स्पेसशिप अवकाशात सोडले जाते. तर, स्पेस क्राफ्ट विमानाच्या मदतीने अवकाशात उंच उड्डाण घेते. यानंतर अवकाश ते स्पेस क्राफ्ट विमानापासून वेगळे केले जाते. 15 हजार फूट उंचीवर त्यापासून वेगळे होते आणि 90 हजार किमी अंतराळात प्रवास करते. 90 मिनिटे अंतराळात सफर करुन हे स्पेस क्राफ्ट विमानाप्रमाणे लँंडिग करेल. नमिरा या व्हर्जिन गॅलेक्टिकची संस्थापक अंतराळवीर आहेत. नमिरा यांचा समावेश 100 अंतराळवीरांच्या यादीत आहे ज्यांनी व्हर्जिन गॅलेक्टिकच्या स्थापनेच्या वेळी तिकिटे बुक केली होती. यासाठी नमिरा यांनी 2 ते 2.5 लाख डॉलर्स इतके पैसे मोजले आहेत.  


कोण आहेत नामिरा सलीम?


नमिरा सलीम यांचा जन्म पाकिस्तानच्या कराची शहरात झाला. कोलंबिया आणि हॉफस्ट्रा विद्यापीठातून त्यांनी पदवी शिक्षण घेतले. त्यांचे कुटुंब आता फ्रान्समध्ये स्थायिक झाले आहे. नमिरा सलीम या पाकिस्तानच्या अधिकृत अंतराळवीर आहेत. पाकिस्तान सरकारने त्यांना 2006 मध्ये ही पदवी दिली होती. 2007 मध्ये नमिराने पाकिस्तान टुरिझमच्या ब्रँड अॅम्बेसेडरचीही जबाबदारी सांभाळली. नमिरा सलीम यांच्या वेबसाइटनुसार, 2007 मध्ये त्यांनी अमेरिकेच्या नासा सेंटरमध्ये सब-ऑर्बिटल स्पेस फ्लाइटचे प्रशिक्षण पूर्ण घेतले होते. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी नमिरा सलीम या पहिल्या पाकिस्तानी आहेत. एप्रिल 2007 मध्ये त्यांनी उत्तर ध्रुवावर प्रवास केला. जानेवारी 2008 मध्ये त्या दक्षिण ध्रुवावर पोहोचल्या. विशेष बाब म्हणजे नमिरा केवळ पाकिस्तानच नाही तर आशियातील पहिली स्कायडायव्हर आहेत. 2008 मध्ये त्यांनी एव्हरेस्टवर स्कायडायव्ह केले होते.