नग्नावस्थेतील तिचे शेकडो Videos, 23 कोटी रुपये, स्मोक डिटेक्टर अन्...; बॉसचा खरा चेहरा उघड
Vulgar Videos Case Rs 23 Crore Compensation: ती मालकाच्या घरातच राहत होती. मात्र तिला मालकाच्या एका कृतीवर संशय आला आणि तिने रुममध्ये तपासणी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं.
Vulgar Videos Case Rs 23 Crore Compensation: अमेरिकेतील मॅनहॅटनमधील न्यायाधिशांनी एका अब्जाधीशाच्या घरी राहणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला नुकसानभरपाई म्हणून तब्बल 2.7 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 23 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. अब्जाधीशाच्या घरी सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि त्याच्याच आलिशान घरातील सर्व्हंट क्वॉटर्समध्ये राहणाऱ्या केली अँडरेडी या तरुणीला त्यावेळी धक्का बसला जेव्हा तिच्यावर या घरात कॅमेराच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जात असल्याचं लक्षात आलं. या तरुणीला या घरात वास्तव्यास असताना छुप्या कॅमेरामधून शूट केलेले तिचे शेकडो तासांचे व्हिडीओ रेकॉर्डींग सापडले. यापैकी बहुतांश व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये ही तरुणी नग्नावस्थेत असल्याचं याहू न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या तरुणीच्या रुममधील स्मोक डिटेक्टरमध्ये छुपा कॅमेरा लपवलेला होता. त्यामध्येचे हे शकडो तासांचं रेकॉर्डींग आढळून आलं.
नेमका कोण होता मालक?
केलीच्या रुममध्ये हा कॅमेरा तिला मुलांची देखभाल करण्यासाठी नियुक्त करणारा तिचा मालक मिचेल एस्पोसितो या 35 वर्षीय उद्योजकानेच लावल्याचं सिद्ध झालं आहे. मिचेल हा थ्रीला रोजा ग्रिल फ्रेंचायजीचा मालक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, केली ही 2021 मध्ये कोलंबियामधून मिचेल आणि त्याची पत्नी डॅनिएलाबरोबर न्यूयॉर्कला आली. मिचेल आणि डॅनिएलाच्या चार मुलांची देखभाल करण्याचं काम करत होती. ती मिचेल आणि त्याच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरातील सर्व्हंट रुममध्ये राहत होती.
...अन् शंका आली; नग्नावस्थेतील व्हिडीओ सापडले
आपल्या रुममधील स्मोक डिटेक्टरबद्दल मालक मिचेलला जास्तच चिंता वाटत असल्याचं केलीला अनेकदा जाणवलं. तिने दाखल केलेल्या खटल्यामध्ये तिने याचा उल्लेख केला आहे. मिचेल अनेकदा तिच्या रुममध्ये छताला लावलेलं स्मोक डिटेक्टर दुरुस्त करण्याच्या बहाण्याने यायचा. नव्या ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतर तिसऱ्याच आठवड्यात केलीने स्वत: तिच्या रुममधील स्मोक डिटेक्टर तपासून पाहण्याचं ठरवलं. तिने हा स्मोक डिटेक्टर तपासला तेव्हा त्यात तिला एक छुपा कॅमेरा आढळून आलं. त्यामध्ये एक मेमरी कार्ड होतं ज्यात केलीच्या रुममधील शेकडो व्हिडीओ क्लिप्स होत्या. यात केली नग्नावस्थेत, कपडे काढताना, कपडे परिधान करताना दिसत आहे, असं तिने कोर्टात केलेल्या लेखी दाव्यामध्ये म्हटलं आहे.
23 कोटींची भरपाई
कॅमेरा काढल्यानंतर केलीने ही रुम पहिल्या मजल्यावर असताना मिचेलपासून वाचण्यासाठी खाली उडी घेत तिथून पळ काढला. तिने दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना या छुप्या कॅमेरातील मेमरी कार्ड दिल्याचं वृत्त 'द न्यू यॉर्क पोस्ट'ने दिलं आहे. पोलिसांनी मिचेलला 24 मार्च 2021 रोजी अटक करण्यात आली. मिचेलला समोपदेशनाबरोबर दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याला केलीला 23 कोटींची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. मात्र केली या निर्णयावर समाधानी नाही. मिचेलने आपल्याला दिलेला त्रास आणि वेदना कधीही न भरुन येणाऱ्या असल्याने त्याला अधिक कठोर शिक्षा द्यायला हवी होती, असं केलीने 'द न्यू यॉर्क पोस्ट'शी बोलताना म्हटलं आहे.