Narendra Modi Gujarat assembly election counting 2022 :  गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये (Gujarat assembly election 2022) भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने सर्वाधिक 156 जागा मिळवत दमदार कामगिरी केली, काँग्रेसला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं. यापार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतादारांचे आभार मानले. विजयामागचं गुपितही सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधील निकालाने हे सिद्ध केलं आहे की, देशासमोर जेव्हा आव्हानं असतात तेव्हा सामान्य जनतेचा विश्वास हा भाजपवरच असतो. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सत्तेत असताना 1 कोटींहून मतदारांनी कधी पाहिलं नव्हतं. आजचा तरूण हा सजग असून त्यामुळे तरूणांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान केलं. त्यांनी सर्व प्रकारचे रेकॉर्ड तोडले असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 


मोदींनी आपल्या भाषणामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांसह भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. आदिवासी समाजही भाजपला आपला आवाज मानत आहे. गुजरातमधील 40 आरक्षित जागांपैकी 24 जागा जिंकल्या असून बदल जाणवत असल्याचंही मोदी म्हणाले. हिमाचलच्या पराभवावरही मोदींनी भाष्य केलं. 


दरम्यान, हिमाचलमध्ये याआधी सरकार बदलायचं तेव्हा पाच टक्के मतदानाचा फरक पडायचा. मात्र आम्हाला एक टक्क्याहून कमी वोट शेअरचा फटका बसल्याचं मोदींनी सांगितलं.