नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्यानमारमध्ये नोटबंदीनंतर सरकारवर होणाऱ्या टीकेवर स्पष्टीकरण दिले आहे.  जे देशाच्या हितासाठी आहेत असे मोठे आणि कठोर निर्णय घेण्यास  आमचे सरकार घाबरत नाही. आमचे सरकार असे निर्णय घेऊ शकते कारण त्यांचे सरकार राजकारणपेक्षा अधिक देशाचा विचार असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटबंदीची घोषणा करण्यात आली त्या संदर्भात आपल्या भाषणात उल्लेख केला.  तसेच पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचाही उल्लेख केला.  सरकारने अनेक मोठे आणि कठीण निर्णय घेतले आहेत. त्यात त्यांनी १ जुलैला लागू केलेल्या जीएसटीचाही उल्लेख केला. 


ते म्हणाले, सर्जिकल स्ट्राइक असो, नोटबंदी असो वा जीएसटी, सर्व निर्णय घेत असताना आम्हांला कोणतीही भीती वाटली नाही. नोटबंदी ही आम्ही काळ्या पैशावर बंदी आणण्यासाठी लागू केली होती. यामुळे अशा लाखो लोकांची माहिती मिळाली की त्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये पडले होते. तसेच त्यांनी इन्कम टॅक्स भरला नव्हता. 


गेल्या तीन महिन्यात सुमारे २ लाख कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. अशा कंपन्या काळ्या पैशाला वैध करण्याच्या कामात लागल्या होत्या. भ्रष्टाचाराशी मुकाबला करण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. भ्रष्ट लोकांमुळे देशातील जनतेला सहन करावे लागते. हे आम्हांला मंजूर नाही. 


आम्ही देशाला बदलत नाही तर भारत निर्माण करीत आहे. यासाठी २०२२ हे टार्गेट ठेवले आहे. तो भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस असणार आहे.