`हाऊडी मोदी` मध्ये पंतप्रधान करणार भारतीय समुदायाला संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्यूस्टनमध्ये `हाऊडी मोदी` कार्यक्रमात सहभागी होणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्यूस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अमेरिकन राष्ट्रपती डोनल्ड देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडीअममध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेत भारतीय समुदायातील साधारण पन्नास हजार जण सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाबद्दल जनतेमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे होर्डींग्ज्स लागले आहेत.
हाऊडी मोदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 1100 हून अधिक स्वयंसेवक रात्रंदिवस एक करुन काम करत आहेत. अमेरिकेतील 48 राज्यांतील भारतीय समुदाय पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी ह्यूस्टन येथे पोहोचत आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमात 60 हून अधिक अमेरिकन सासंद सहभागी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीचा सांस्कृतिक कार्यक्रम साधारण 90 मिनिटांचा असेल. या सांस्कृतिक कार्यक्रमात भारत-अमेरिकी समुदायाची विविधता दिसून येईल.
टेक्सास आणि पूर्ण अमेरिकेतील 400 कलाकार 17 ग्रुप्समधून यामध्ये सहभागी होतील. स्टेडीयममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकार नॉनस्टॉप कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा बजेट वाढवून 2.4 मिलियन डॉलर करण्यात आला.