जी २० परिषद : भारत, अमेरिका आणि जपान या देशांच्या प्रमुखांनी घेतली भेट
जी २० परिषदेपूर्वी भारत, अमेरिका आणि जपान या तीन देशांच्या प्रमुखांनी भेट घेतली.
ओसाका : जपानमध्ये ओसाका शहरात सुरु असलेल्या जी २० परिषदेपूर्वी भारत, अमेरिका आणि जपान या तीन देशांच्या प्रमुखांनी भेट घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे अध्यक्ष शिंजो आबे या तीन नेत्यांची त्रिपक्षीय चर्चा झाली. जपान अमेरिका इंडिया ही तीन अद्याक्षरं मिळून जय असा शब्द होतो, 'जय'चा भारतात अर्थ विजय असा आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
दहशतवादापासून व्यापारापर्यंत अनेक मुद्द्यांवर या नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही द्वीपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत टेरीफच्या मुद्द्यासह दहशतवादावर चर्चा झाला. भारत आणि अमेरिका या दोन देशातले संबंध दृढ करण्याचा निश्चय दोन्ही देशांनी व्यक्त केला.