एलियनच्या अस्तित्वाबाबत NASA चा आजपर्यंतचा मोठा खुलासा; जाहीर केला 33 पानांचा अहवाल
एलियनच्या अस्तित्वाबात NASA अस्तित्वाबाबत नासाने प्रथमच जाहीररीत्या खुलासा केला आहे. एक अहवालच नासाने सादर केला आहे.
NASA UFO Report : पृथ्वीतलावर एलियन्स आहेत का? आतापर्यंत दावा करण्यात आलेल्या उडत्या तबकड्या ख-या आहेत का? एलियन्स दिसतात तरी कसे? एलियनच्या अस्तित्वाबात अमेरिकन अंतराळ संस्था अर्थात NASA ने आजपर्यंतचा मोठा खुलासा केला आहे. नासाने 33 पानांचा अहवाल जाहीर केला आहे. यात नासाच्या वैज्ञानिंकानी खळबळजनक दावे केले आहेत.
एलियन्सच्या पुराव्याबाबत नासाचा खुलासा
या अहवालात यूएफओबाबत सुमारे वर्षभर चाललेल्या अभ्यासाचे निष्कर्ष मांडण्यात आले आहे. UFO किंवा UAP काय आहे हे माहित नाही. मात्र, त्यांच्या दुसऱ्या जगाशी संबध आहे. UFO चा अभ्यास करण्यासाठी नवीन वैज्ञानिक तंत्रांची गरज आहे. यासाठी उच्च-तंत्रज्ञान उपग्रहांची आवश्यकता आहे. आकाशात उडणाऱ्या अज्ञात वस्तू शोधण्याच्या पद्धतीत बदल करण्याचीही गरज आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खगोलभौतिकशास्त्रज्ञ डेव्हिड स्पर्गेल यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली होती. त्यांनी अशा घटनांशी संबंधित डेटाचा सतत 9 महिने तपास केला.
एलियन खरचं आहेत की नुसत्या अफवा
UAP तसेच एलियन बाबत अनेक अफवा आहे. खळबळ निर्माण करण्यासाठी यासंबधीत अफवा पसरवल्या जातात. मात्र, UAP कडे सनसनाटी म्हणून न पाहता याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले जावे यासाठी वैज्ञानिक पद्धतीने याबाबतची माहिती सादर करण्याचे आमचे प्रयत्न आहेत असे नासाच्या पथकाने सांगितले.
परग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का?
UAPs बाहेरील जगातून आल्याचा किंवा ते दुसर्या जगातून आल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. मात्र, अवकाशात अब्जावधी आकाशगंगा आहेत. या आकाशगंगांमध्ये कोट्यवधी तारे असताना. यामुळे दुसरी पृथ्वी अस्तित्वात असू शकते अशी शक्यता नासाने व्यक्त केली आहे.
अमेरिकेकडे खरचं एलियनचे मृतदेह आहेत का?
अमेरिकेकडे खरचं एलियनचे मृतदेह आहेत का? याबाबत नासाचे बडे अधिकारी बिल नेल्सन यांनी खुलासा केला आहे. एलिनय संबधीत पुरावे लपवून ठेवल्याचा आरोप नेहमीच अमेरिकेवर केला जातो. मात्र, याबाबतचे पुरावे दाखवावेत. नासा UFO तसेच UAP बाबत संशोधन करत आहे.
एलियनचा शोध घेण्यासाठी AI ची मदत घेणार
एलियनचा शोध घेण्यासाठी AI ची मदत घेणार असल्याचे नासाने आपल्या अहवालात म्हंटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि मशीन लर्निंगच्या माध्यमातून यूएफओसह दुर्मिळ घटनाचा अभ्यास केला जाणार आहे. NASA ने अलीकडेच UFOs वरील संशोधनासाठी 16 सदस्यीय पॅनल तयार केले आहे. एका संचालकाच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल काम करणार आहे. या टीममध्ये वैज्ञानिक, वैमानिक आणि डेटा विश्लेषण तज्ञांचा समावेश आहे.