NASA मध्ये नोकरीसाठी काय लागत शिक्षण? किती मिळतो पगार? कुठे करायचा अर्ज? A टू Z माहिती
NASA Job Details: नासातील नोकरीसाठी काय शिक्षण लागतं? किती पगार मिळतो? नोकरीचे अर्ज कुठे निघतात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
NASA Job Details: नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा ही एक अमेरिका सरकारची स्पेस एजन्सी आहे. अंतराळासंबंधी विषयांवर ही संस्था संशोधन करते तसेच अंतराळात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून असते. अमेरिकाच नव्हे तर जगभरातील देशांकडे अंतराळातील रहस्य माहिती करुन घेण्यासाठी स्वत:ची यंत्रणा आहे. भारताकडे इस्रो ही संस्था हे काम करते. पण या सर्वात नासाचे नाव सर्वात वर घेतले जाते. अंतराळाची आवड असलेल्या, त्याचे शिक्षण घेणाऱ्या जगभरातील तरुणांना नासामध्ये काम करण्याची इच्छा असते. पण यासाठी काय शिक्षण लागतं? नोकरीचे अर्ज कुठे निघतात? याबद्दल माहिती नसते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नासामध्ये नोकरीसाठी शिक्षण
नासामध्ये काम करु इच्छिणाऱ्यांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही एरोनॉटिक्स किंवा एअरोस्पेस इंजिनीअरिंग करु शकता. तुम्ही कॉम्प्यूटर सायन्स, खगोलशास्त्र, मॅथ्स, इंजिनीअरिंग आणि डेटा सायन्सचे विद्यार्थी असाल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकता. सायन्स स्ट्रीममध्ये एरोनॉटिक्सला खूप महत्व आहे. कारण यामध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगपासून इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगपर्यंत सर्वकाही शिकायला मिळतं.
एरोनॉटिक्स शिकवणारी टॉप कॉलेज
आयआयटी कानपूर
मद्रास इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, चेन्नई
स्कूल ऑफ एयरोनॉटिक्स, दिल्ली
मनिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी
पंजाब इंजीनियरिंग, कॉलेज
IISST, तिरुवनंतपुरम
IIAE, देहरादून
कशी मिळते नोकरी?
मान्यताप्राप्त संस्थेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना यात नोकरीवेळी प्राधान्य दिले जाते. अंतराळ क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असेल तर तुमचा विचार केला जाऊ शकतो. नासाच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी अपडेट देण्यात येते. येथे तुम्ही पार्ट टाईम नोकरी किंवा फेलोशिपसाठी अर्ज करु शकता.
काय लागतं शिक्षण?
नासामध्ये सायंटिस्ट व्हायचं असेल तर तुम्हाला पीएचडी करावी लागले. टेक्निकलमध्ये जाऊ इच्छित असाल तर तुम्हाला मॅथ्स, सायन्स आणि कॉम्प्यूटर या विषयावंर लक्ष द्यावे लागेल.
किती मिळेल पगार?
नोकरी कुठेही करत असलो तरी पगाराचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा असतो. नासामध्ये नोकरी करणाऱ्यांना सुरुवातीला वार्षिक 30 ते 50 लाखापर्यंतचे पॅकेज मिळू शकते. कर्मचाऱ्यांचा पगार हा त्याच्या पद आणि अनुभवावर कमी किंवा जास्त असू शकतो. काही पदांसाठी तर सुरुवातीलाच 50 लाखांचे पॅकेज मिळते. पगारासोबत इतर सुविधादेखील मिळतात.