वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या (NASA) हाती  एक मोठं यश लागलं आहे. मंगळावर 'पर्सिव्हीरन्स' रोव्हरने यशस्वी लँडिंग केली आहे. सहा महिन्यांपूर्वी हे रोव्हर मंगळावर पाठवण्यात आलं. आता मंगळावर खरचं कधी जीवसृष्टी होती का? याचा तपासही 'पर्सिव्हीरन्स' रोव्हर करणार आहे.  अमेरिकेनं रात्री 2 वाजून 30 मिनीटांच्या दरम्यान पर्सिव्हरन्स मंगळावर उतरवलं. अमेरिकेनं रात्री 2 वाजून 30 मिनीटांच्या दरम्यान पर्सिव्हरन्स मंगळावर उतरवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे 'पर्सिव्हीरन्स' रोव्हर जमिनीवर उतरताच एक फोटो पाठवला आहे. नासाने हा ऐतिहासिक क्षण ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. 



जेजेरो क्रेटर (Jezero Crater) मंगळ ग्रहावरील अत्यंत दुर्गम भाग आहे. याच ठिकाणी 'पर्सिव्हीअरन्स' रोव्हर उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष 'पर्सिव्हीअरन्स' रोव्हरच्या लँडिंगकडे लागलं होत. आता काही वर्ष 'पर्सिव्हीरन्स' रोव्हर त्याठिकाणी संशोधन करणार असल्याचं नासाने सांगितलं आहे. 



सांगायचं झालं तर 'पर्सिव्हीरन्स' रोव्हरमध्ये 23 कॅमेरे लावण्यात आले आहेत. शिवाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात येणार आहे. मंगळावर सर्वाधिक रोवर पाठवणारा अमेरिका जगभरातील पहिला देश असल्याचं देखील म्हटल जात आहे.