Nasa ला हवीये तुमची मदत; मंगळावर शोधून काढायचीये `ही` गोष्ट...चला कामाला लागा
NASA ने आपल्या सिटिझन सायन्स प्लॅटफॉर्म Juniverse वर एक प्रोजेक्ट आयोजित केला आहे.
मुंबई : मंगळावर जीवसृष्टीची शक्यता शोधण्यासाठी जगभरातील अंतराळ संस्था त्यांची मोहीम राबवतेय. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि चीनची अंतराळ संस्था यात आघाडीवर आहेत. नासाचे शास्त्रज्ञ मंगळाच्या वातावरणाशी संबंधित एक गूढ उकलण्यासाठी सध्या काम करतंय.
मुख्य म्हणजे यासाठी तुम्हीही नासाला मदत करू शकता. यासाठी NASA ने आपल्या सिटिझन सायन्स प्लॅटफॉर्म Juniverse वर एक प्रोजेक्ट आयोजित केला आहे. 'क्लाउडस्पॉटिंग ऑन मार्स' नावाच्या या प्रकल्पात लोकांना मंगळावरील ढग ओळखण्याची संधी मिळणार आहे.
नासाच्या म्हणण्याप्रमाणे, लोकांना त्यांच्या डोळ्यांनी ओळखणं सोपं आहे. असं मानलं जातं की, मंगळावर अब्जावधी वर्षांपूर्वी तलाव आणि नद्या होत्या. त्यावेळी मंगळाचे वातावरण दाट होतं.
शास्त्रज्ञांना हे समजून घ्यायचं आहे की, ग्रहाने वातावरण कालांतराने गमावलं. तुम्हाला या प्रकल्पात नासाच्या शास्त्रज्ञांना मदत करायची असेल किंवा खगोलशास्त्रात रस असेल तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून प्रकल्पात सहभागी होऊ शकता.
प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा
नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेतील पोस्टडॉक्टरल संशोधक मारेक स्लिपस्की म्हणाले, "ढगांची निर्मिती कशामुळे होते हे आम्हाला शिकायचं आहे."
प्रकल्पाच्या यशामुळे संशोधकांना हे समजण्यास मदत होऊ शकतं की, मंगळाचं वातावरण पृथ्वीच्या तुलनेत केवळ 1 टक्के घनतेने का आहे. तर पुराव्यावरून असं दिसून येतंय की, मंगळाचं वातावरण पूर्वीपेक्षा जास्त दाट होतं.
मंगळावरील ढग ओळखण्यासाठी आणि त्यांचं प्रमाण निश्चित करण्यासाठी नासाकडे 16 वर्षांचा डेटा आहे. मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर (MRO) द्वारे हा डेटा संकलित करण्यात आला आहे. 2006 पासून ते मंगळाचा अभ्यास करत आहे. या ऑर्बिटरच्या उपकरणाने मंगळाची अनेक फोटो घेतलेत. यामध्ये ढग कमानीसारखे दिसतात. या कमानी खुणावण्यासाठी नासाची टीम जनतेची मदत घेतेय.