नासाचं नवं चॅलेंज, साडेतीन कोटी जिंकण्याची संधी
तुम्ही नासाचं Challenge घ्यायला तयार आहात का?
वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) मंगळावरील मानवनिर्मित मोहिमेबाबत सध्या काम करत आहे. नासासमोर दीर्घ अंतराळ मोहिमेसाठीचे असणारे मोठे आव्हान म्हणजे अंतराळवीरांच्या अन्नाची व्यवस्था करणे. ही समस्या सोडवण्यासाठी नासाने लोकांना एक चॅलेंज दिले आहे. नासाने यासाठी 5 लाख डॉलर्स (3.6 कोटी) चे बक्षीसही ठेवले आहे.
पृथ्वी ते मंगळापर्यंतचे अंतर हे 11.4 कोटी किलोमीटर इतके आहे, म्हणजे जवळ जवळ दोन वर्षे. मंगळापर्यंतची यात्रा ही खुप लांबची असल्यामुळे अंतराळवीरांच्या अन्नाची सोय करणे खुप अवघड झाले आहे. शिवाय इतक्या लांब जड सामान वाहून नेणं आणि ते जास्त काळ टिकवनं हे शक्य होणारं नाही. त्यासाठीचा एकमात्रं उपाय म्हणजे अंतराळयात्रेत अंतराळवीरांच्या जेवणासाठीची उत्पादन क्षमता विकसित करणे.
अन्नाच्या या समस्येला सोडवण्यासाठी नासाने व्यापारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, हौशी गुंतवणुकदार आणि इतरांसाठी एक चॅलेंज दिले आहे. Johnson Space Center मधील प्रगत अन्न तंत्रज्ञानाचे मुख्य शास्त्रज्ञ ग्रॉस डग्लस (Grace Douglas) यांनी दीर्घ अवकाश अभियानांसाठी स्प्लिट तंत्रज्ञानाद्वारे जर्नल ऑफ न्यूट्रिशन या लेखात सरकारच्या गरजादेखील नमूद केल्या आहेत.
डगलस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनुसार अवकाशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंतराळात मानवी जीवन टिकवणे. मानवी इतिहासामध्ये, क्षितिजाच्या पुढे काय आहे, हे शोधण्यासाठी प्रवास केला गेला आहे, परंतु आहार आणि पौष्टिक गरजांच्या अपयशामुळे शोध मोहीमेसाठी गेलेले अंतराळवीर परत येऊ शकले नाहीत. त्यामुळे आता या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी नासाने ही शक्कल लढवली आहे.