Pinwheel Galaxy : नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीने  पिनव्हील गॅलेक्सीचा अद्भूत फोटो शेअर केला आहे. या पिनव्हील आकाशगंगेचा रंगीत आणि चमकारदार फोटो खलोगप्रेमींना अचंबित करत आहे. पिनव्हील  आकाशगंगेचा आकार आपल्या आकाशगंगेपेक्षा 70 टक्के  पटीने मोठा आहे. या आकाशगंगेत असंख्य तारे असल्याचा दावा करण्यात आला आहे. आकाशगंगा हे एक रहस्यमयी जग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिनव्हील गॅलेक्सी उर्सा मेजर नक्षत्रामध्ये पृथ्वीपासून 21 दशलक्ष प्रकाश-वर्षे (6.4 मेगापार्सेक) दूर असलेली एक स्पायरल (Spiral Galaxy) दिर्घिका आहे. पिनव्हील गॅलेक्सी आकाराने 170,000 प्रकाश-वर्ष व्यास इतकी विशाल आहे. उर्सा मेजर बिग डिपर म्हणूनही ओळखले जाते. नासाने  ''गॅलेक्टिक स्पेक्ट्रम'' म्हटले आहे.


रंगीत  पिनव्हील गॅलेक्सी लक्ष वेधून घेतेय


पिनव्हील गॅलेक्सी अतिशय रंगीत आहे. या आकाश गंगेत पिवळ्या, लाल, जांभळ्या आणि निळ्या रंगाचे असंख्या तारे आहेत. या आकाशगंगेच्या शेपटाजवळ असलेले निळे तारे अवकाशाच्या अंधारात लुप्त होत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. हबल, चंद्र एक्स-रे ऑब्झर्व्हेटरी, स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप आणि गॅलेक्सी इव्होल्यूशन एक्सप्लोरर मधील डेटा एकत्रित केल्यानंतर पिनव्हील गॅलेक्सीची ही प्रतिमा तयार करण्यात आली आहे. 


NASA ने केले पिनव्हील गॅलेक्सीच्या छायाचित्राचे वर्णन


पिनव्हील गॅलेक्सीचा हा अत्यंत शक्तीशाली फोटो कशा प्रकारे कॅप्चर केला याचे वर्णन नासाने केले आहे. या आकाशगंगेतील  पिवळा प्रकाश @NASAHubble वरून दिसणारा दृश्यमान प्रकाश आहे. आकाशगंगेत दिसणारा  लाल रंगाचा प्रकाश स्पिट्झर स्पेस टेलिस्कोपने टिपला आहे. लाल रंगाचे तारे तयार होत आहेत. @NASAChandraXRay ने जांभळ्या रंगात दर्शविलेले सर्वात उष्ण क्षेत्र कॅप्चर केले आहे. येथे आपल्याला स्फोट झालेले तारे, वायू आणि सामग्री ब्लॅक होलशी टक्कर घेताना दिसत आहेत. आकाशगंगेच्या शेवटी, निळा भाग दिसतोय. येथे गॅलेक्सी इव्होल्यूशनने एक्सप्लोरर उष्ण तरुण तार्‍यांकडून प्रक्षेपित केलेल्या अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाचे चित्रण केले आहे.


नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीने शोधल्या 10 अब्ज वर्षांपूर्वीच्या आकाशगंगा


नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीने दोन नव्या आकाशगंगांचा शोधल्या होत्या. या आकाशगंगा अनुक्रमे 8 आणि 10 अब्ज वर्षांपूर्वीच्या आहेत. पृथ्वीपासून या आकाशगंगा 19 अब्ज अंतरावर आहेत. अनेक आकाशगंगांचा रंग हा निळा असतो, पण या दोन्ही आकाशगंगांचा रंग लालसर आहे. जेम्स वेबने शोधलेल्या या आकाशगंगांना अनुक्रमे 'आरएस13' आणि 'आरएस14' अशी नावं देण्यात आली आहेत. या दोन्ही आकाशगंगांच्या प्रतिमा एकाच प्रतिमेत कैद झाल्यायत.  या आकाशगंगांच्या शोधामुळे ब्रह्मांडाची अनेक रहस्ये जाणून घेण्यासाठी मदत मिळणार आहे.