NASA ने मंगळ ग्रहावर तयार केला ऑक्सिजन, मानवी वसाहतीच्या दिशेनं सर्वात मोठं पाऊल
नासाच्या मंगळ मोहिमेला मोठे यश आले आहे. नासाने मंगळ ग्रहावर ऑक्सिजनची निर्मीती केली आहे.
NEWS: चंद्रावर आणि मंगळ ग्रहावर मानवी वस्ती विकसीत करण्यासाठी मानवाचे अथक प्रयत्न सुरु आहेत. मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा(National Aeronautics and Space Administration) तर्फे संशोधन सुरु आहे. मंगळ ग्रहावर ऑक्सीजन निर्मिती करण्यात वैज्ञानिकांना मोठं यश आले आहे. मंगळ ग्रहावर संधोन करणाऱ्या NASA च्या Perseverance Rover च्या मदतीने ऑक्सिजन तयार करण्यात आला आहे. या ऑक्सिजनमध्ये एक कुत्रा 10 तास जिवंत राहू शकतो.
मंगळ ग्रहावर ऑक्सिजन निर्मीती करण्यात यश
मंगळ ग्रह हा पृथ्वीपासून 40 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. NASA च्या संशोधनामुळे मंगळ ग्रहावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. NASA च्या Perseverance Rover च्या मदतीने मंगळ ग्रहावर 122 ग्रॅम ऑक्सिजन तयार केला. इतक्या प्रमाणात असलेल्या या ऑक्सिजनमध्ये एक लहान कुत्रा तब्बल 10 तासांपर्यंत श्वास घेवून जिवंत राहू शकतो.
NASA ने मंगळ ग्रहावर असा तयार केला ऑक्सिजन
NASA चे Perseverance Rover हे मागील अनेक वर्षांपासून मंगळ ग्रहावर संशोधन करत आहे. Perseverance Rover हे नासाने विकसीत केलेले विशेष उपकरण आहे. Perseverance Rover मध्ये Moxie नावाचे पेलोड अर्थात उपकरण बसवण्यात आले आहे. या डिव्हाईसच्या मदतीने मंगळावर असलेल्या कार्बन डायऑक्साईडपासून ऑक्सिजन तयार करण्यात आला आहे. ज्या प्रमाणे जेवणाचा छोटा डबा असतो त्या आकाराचे आकाराचे हे छोटेसे डिव्हाईस आहे. या डिव्हाईसच्या मदतीने एका तासात 6 ग्रॅम ऑक्सिजनची निर्मिती होते. गेल्यावर्षी प्रायोगिक तत्वावर ऑक्सिजन तयार करण्यात आला होता. याच्या यशा नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात महणजे तब्बल 122 ग्रॅम ऑक्सिजन तयार करण्यात नासाला यश आले आहे. Moxie या पेलोडच्या मदतीने कोणत्याही वातावरणात ऑक्सिजन तयार करता येवू शकतो.
मंगळ ग्रहावर वास्तव्य करण्याच्या मानवाच्या आशा पल्लवीत
उपकरण्याच्या मदतीने थेट मंगळ ग्राहवर ऑक्सिजन निर्मीती करण्यात यश आल्यामुळे मंगळ ग्रहावर वास्तव्य करण्याच्या मानवाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भविष्यात मानवाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे इतक्या प्रमाणात ऑक्सिजन नि र्मीती करणे शक्य होऊ शकते असे या प्रयोगाच्या यशावरुन दिसत आहे. मंगळ ग्रहावर सुरु असलेल्या संशोधनातील हे सर्वात मोठे यश मानले जात आहे.