मुंबई : असं म्हणतात आयुष्यात किमान एकदा तरी 'रिस्क' ही घ्यावीच लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक नोकरदार मंडळींना कामाच्या ताणतणावामुळे आपल्या सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात तडजोडी कराव्या लागतात. 


३५ वर्षीय नतालिए गोमेजला मात्र तिच्या आयुष्यातील या समस्येवर मात करताना नवी वाट मिळाली. कामाचे तास आणि त्याच्याशी निगडीत तडजोडीला कंटाळून नतालिएने नवी नोकरी शोधण्याचे प्रयत्न केले पण तिच्या हाती काहीच आले नाही. 


'आयडीयाची कल्पना' 


इंटरनेटवर शोधाशोध करताना तिला वेबसाईटवर जुने कपडे विकण्याची संधी दिसली. याबाबत तिने अधिक चौकशी केल्यानंतर तिला कळले की १५ डॉलरपेक्षा अधिक किंमतीच्या वस्तू विकल्यास २०% कमीशन मिळते. 


सुरूवातीला स्वतः काही वस्तू विकल्या. हळूहळू यामधून सकारात्मक मिळणारे निकाल पाहून तिने वापरलेले कपडे विकायला सुरूवात केली. यामधूनच तिला कल्पना सुचली.  


पहिल्या प्रयत्नामध्ये ४० डॉलरची कमाई 


पहिल्या वेळेस कपडे विकल्यानंतर तिला ४० डॉलर मिळाले. हळूहळू आपला व्यावसाय वाढवण्यासाठी तिने घरूनच कपडे विकायला सुरूवात केली. पहिल्या महिन्यात विक्री सुमारे साडे सहा लाख रूपये झाली. यानंतर आठ महिन्यातच तिनं स्वतःचं ऑनलाईन स्टोअर सुरू केलं. 


गोमेजने २१ महिन्यात सुमारे १ लाख डॉलर म्हणजेच ६५ लाख रूपये कमावले. गोमेज महिन्याला सुमारे ३ लाख रूपये कमावते. 


तरूणाईचा ओढा ऑनलाईन सेलकडे 


गोमेज दर आठवड्याला 10 तास केवळ कपड्यांच्या खरेदीसाठी खर्च करते. एका सर्व्हेनुसार १४-१९ वयोगटातील मुलं ३६% ऑनलाईनच्या माध्यमातून री सेल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कपडे आणि फर्नीचर घेणं पसंत करतात.