Trekking News : ट्रेकिंग करणाऱ्यांच्या पायात बेड्या; नव्या नियमामुळे अनेकजण पेचात
Trekking News : गेल्या काही वर्षांमध्ये डोंगरवाटा धुंडाळणाऱ्यांया आणि निसर्गाला जवळून पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. थोडक्यात ट्रेकिंग करणाऱ्यांचं कुटुंब दिवसागणिक वाढत चाललं आहे. पण, हा नवा नियम मात्र काहींना रुचलेला नाही.
Trekking News : एखाद्या ठिकाणी जाऊन तिथल्या (Tourists places) प्रेक्षणीय स्थळांना भेट देत फोटो काढत ते फोटो जपण्याचे दिवस आता केव्हाच मागे पडले. त्याऐवजी एखादी (Mountain Roads) डोंगरवाट सर करत, एखाद्या सुळक्यावर जाऊन तिथून दिसणाऱ्या दृश्याला न्याहाळत बसण्याला प्राधान्य देणाऱ्यांचीच संध्या लक्षणीयरित्या वाढली आहे. सोप्या शब्दांत सांगावं तर, ट्रेकिंगकडे अनेकांचाच कल दिसून येत आहे. एकादी गडवाट असो किंवा लेणी, एखादा डोंगर असो किंवा अमूक एका उंचीवर स्थिरावलेलं पठार असो. प्रत्येक ठिकाणी जात तिथलं (Geographical Importance) भौगोलिक महत्त्वं, त्या ठिकाणी असणारी जैवविविधता आणि अशा अनेक गोष्टींविषयीचे बारकावे टीपण्याकडे अनेकांचाच कल दिसून येतो.
काही मंडळी तर, या क्षेत्रात इतकी सराईत होतात की देशोदेशीचे पर्वत सर करण्यासाठीची त्यांची उत्सुकता आणि कुतूहल अनेकांसाठीच प्रेरणादायी ठरतं. अशाच ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी काही परिसर, भाग, देश विशेष आवडीचे. हिमाचल प्रदेश, काश्मीर, सह्याद्री पर्वतरांगा त्यातलीच काही नावं. इथं शेजारी राष्ट्र नेपाळलाही (Nepal trekking destinations) विसरता येणार नाही बरं.
ट्रेकिंग करणाऱ्या प्रत्येकाच्याच विशलिस्टमध्ये नेपाळमधील एकातरी ट्रेकचं नाव असतं. पण आता मात्र याच मंडळींच्या पायात बेड्या पडू शकतात. कारण ठरु शकतं एक नवा नियम. नेपाळमधील प्रशासनाच्या निर्णयानुसार एकट्यानं किंवा स्वतंत्रपणे ट्रेक करणाऱ्या परदेशी ट्रेकर्ससाठी इथं बंदी घालण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून हा नियम लागू असेल.
हेसुद्धा पाहा : Japan : जपाननं वेधलं जगाचं लक्ष; देशातील बेटांची संख्या 14 हजारांपलीकडे
गाईड अथवा मार्गदर्शकाशिवाय इथं ट्रेक करता येणार नाही, असा नियम नेपाळ पर्यटन मंत्रालयानं जारी केला आहे. पर्यटन मंडळाचे प्रवक्ते Mani Raj Lamichhane यांनी दिलेल्या माहितीनुसार यापुढं नेपाळमध्ये सोलो किंवा स्वतंत्र ट्रेक करायचा असल्यास तुमच्यासोबत Guide असणं अनिवार्य असेल. ट्रेकर्सच्याच सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.
का घेण्यात आला हा निर्णय?
शासकीय अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार दरवर्षी नेपाळमध्ये येणाऱ्या ट्रेकर्सपैकी 40 चे 50 जणांचा ट्रेकदरम्यानच संपर्क तुटतो. ज्यामुळं संपूर्ण जगभरात नेपाळ ट्रेकिंगसाठी योग्य जागा नाही, असा चुकीचा संदेश पोहोचतो. ज्यामुळं ही चुकीची प्रतिमा पक्की होण्याआधीच हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय यामुळं नेपाळमध्ये रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
कोरोना काळाआधी नेपाळमध्ये जवळपास 46000 परदेशी नागरिकांनी येऊन ट्रेकिंगचा अनुभव घेतला होता. पण, यापुढं तुम्ही इथं ट्रेकिंगसाठी येणार असाल तर रितसर गाईड घेऊनच या.
नेपाळमधील काही महत्त्वाचे ट्रेक्स खालीलप्रमाणं...
- एव्हरेस्ट थ्री पास ट्रेक (Everest three pass trek)
-एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक (Everest basecamp trek)
- मानसलू सर्किट ट्रेक
- लांगतांग ट्रेक
- अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक
- अप्पर मस्टँग ट्रेक
- गोक्यो लेक्स ट्रेक
- धौलागिरी सर्किट ट्रेक
- नार फू व्हॅली ट्रेक
- अन्नपूर्णा सर्किट ट्रेक (Annapurna Circuit trek)