Crime News : नेपाळमधील (Nepal) डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर 26 वर्षीय तरुणाच्या पोटातून दारुची बाटली (vodka bottle) काढली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली आहे. नेपाळच्या रौतहाट जिल्ह्यात राहणाऱ्या नूरसाद मन्सुरी यांने पोटात दुखत असल्याचे सांगत डॉक्टरांकडे (Doctor) गेला होता. तपासण्या केल्यानंतर त्याच्या पोटात व्होडकाची बाटली असल्याचे समोर आले. त्यानंतर नूरसादवर शस्त्रक्रिया (operation) करुन ती बाटली बाहेर काढण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाटलीमुळे आतड्यांना गंभीर दुखापत


द हिमालयन टाईम्सच्या वृत्तानुसार, पाच दिवसांपूर्वी नूरसादला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडीच तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पोटातून बाटली बाहेर काढण्यात आली. बाटलीमुळे त्याचे आतडे फाटले होते. त्यामुळे विष्ठा बाहेर पडत होती आणि त्याच्या आतड्यांमध्ये जळजळ होत होती. मात्र आता त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नुरसदच्या मित्रांनी त्याला दारू पाजली आणि त्याच्या गुदाशयातून जबरदस्तीने बाटली पोटात टाकली असावी. दुसरीकडे नूरसादच्या पोटात गुदामार्गातून बाटली घातल्याचा संशय आहे, असे अहवालातही म्हटले आहे. रौतहाट पोलिसांनी या घटनेप्रकरणी शेख समीम याला अटक केली असून नुरसदच्या काही मित्रांचीही चौकशी केली आहे. "आम्हाला समीमवर संशय असल्याने आम्ही त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहोत," असे पोलिसांनी सांगितले. रौतहाटचे पोलिस अधीक्षक बीर बहादूर बुधा मगर म्हणाले की, नुरसदचे आणखी काही मित्र फरार असून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.


दरम्यान, अशीच एक घटना गेल्या वर्षी गुजरातमध्ये उघडकीस आली होती. एका व्यक्तीच्या गुदाशयात काही जणांनी स्टीलचा ग्लास घातल्याचा आरोप करण्यात आला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या या घटनेनंतर गुजरातच्या सुरतमध्ये गुन्हा नोंदवला गेला होता. 8 सेमी व्यासाचा आणि 15 सेमी लांबीचा हा ग्लास ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढला होता.