Nepal Flight Accident: आकाशातच विमान तिरकं झालं अन् पुढल्या क्षणी...; विमानतळावरुन शूट केलेला Video पाहाच
Nepal Plane Crash Video: काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका विमानाचा भीषण अपघात झाला आहे.
Nepal Plane Crash Video: नेपाळची राजधानी काठमांडु येथे झालेल्या विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान टेक ऑफ करताना अपघात घडला. या अपघात इतका भीषण होता की काहीच सेंकदात विमानाचा स्फोट झाला. तर, विमानातून आगीचे लोण पसरले होते. या अपघाताची भयानक दृष्ये समोर आली आहे. सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
त्रिभुवना विमानतळावरुन 19 प्रवाशांना घेऊन जाणारे सौर्य एअरलाइन्सचे विमान चेक ऑफ करताच अवघ्या काही सेंकदात खाली कोसळले आणि पाहता पाहता विमानाचा आग लागली. या दुर्घटनेतून पायलटचा बचावण्यात आले आहे. मात्र, त्याची प्रकृती गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैमानिक शुद्धीत आल्यानंतर अपघात कसा घडला, याची चौकशी करण्यात येणार आहे.
प्रत्यक्षदर्शीनी स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, विमान दक्षिणेकडे टेक ऑफ करत होते. आकाशात उड्डाण घेतल्यानंतर काहीच वेळात विमान पलटले आणि आकाशात हेलकावे खायला लागलं. विमान खालच्या दिशेला झुकलं आणि वेगाने खाली आले आणि जमिनीवर कोसळले. जमिनीवर कोसळताच विमानाला आग लागली त्यानंतही विमान प्लेन रनवेच्या पू्र्वेकडील दरीत कोसळले.
अपघातानंतर संपूर्ण विमानतळावर धुराचे लोट पसरले होत. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानाचे पायलट 37 वर्षीय कॅप्टन एम आर शाक्य यांचा जीव बचावला आहे. त्यांना रेस्क्यू करण्यात आले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, विमानाला स्टाफ तांत्रिक दुरुस्तीसाठी घेऊन जात होते. विमानाने रनवे 2 वरुन टेक ऑफ घेतलं आणि रनवे 20 वर क्रॅश झाले.
अपघाताचे कारण समोर
विमान दुर्घटनेबाबत सांगितलं जात आहे की, विमानाने चुकीचे वळण घेतल्याने हा अपघात घडला आहे. विमानने उड्डाण केल्यानंतर डाव्या बाजूला वळायचं होतं मात्र विमानाने उजव्या बाजूने वळण घेतले. त्यानंतर मिनिटभरातच विमान क्रॅश झाले.
नेपाळमध्ये विमान अपघात सुरूच
नेपाळमध्ये विमान दुर्घटनांच्या घटना थांबतानाच दिसत नाहीये. मागील वर्षी जानेवारी महिन्यात मोठी दुर्घटना घडली होती. यात 72 जणांचा मृत्यू झाला होता. एयरलाइन्सचे विमान पोखरा विमानतळावर लँडिग होण्याआधीच क्रॅश झाले होते.
मे 2022 मध्ये नेपाळमध्ये आणखी एक विमान अपघात झाला होता त्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. हे विमान पोखरा येथून जोसमोस येथे जात होते. तेव्हाच क्रॅश झाले होते.