काठमांडू : भारताच्या शेजारील देश नेपाळच्या राजकारणात बऱ्याच हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत असताना केपी शर्मा ओली यांनी राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतर आपातकालीन बैठक बोलवली. या बैठकीत नेपाळच्या संसदेचं बजेट सेशन रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आता संध्याकाळी पीएम केपी ओली देशाला संबोधित करणार आहेत. ज्यामध्ये ते काही तरी मोठी घोषणा करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरोध भारी पडणार?


नेपाळने राजकीय संकटात ही नवा नकाशा जाहीर केला. नेपाळने उत्तराखंडमधील 3 गाव आपल्या नकाशात दाखवल्याने भारताने देखील याचा निषेध केला. पण नेपाळच्या संसदेत तो मान्य करण्यात आला. यानंतर ओली यांनी भारत विरोधी अनेक वक्तव्य केली. कोरोना व्हायरस हा भारतातून नेपाळमध्ये आल्याचं देखील त्यांनी म्हटलं. नेपाळमधील सरकार अस्थीर करण्याचा आरोप देखील त्यांनी भारतावर लावला. पण भारताने हे सर्व आरोप उत्तर देत फेटाळून लावले.


नेपाळ चीनच्या चालीमध्ये फसला. भारत विरोधी वक्तव्य आणि चीनची साथ यामुळे माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड पुन्हा सक्रीय झाले. त्यांनी केपी ओली यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यांनी आधी ओली यांना आव्हान दिलं की, भारताने त्यांचं सरकार कशा प्रकार अस्थीर केलं याबाबत खुलासा करावा. त्यानंतर त्यांनी म्हटलं की, भारताला नको तर मला त्यांचा राजीनामा हवा आहे.


नेपाळमधील 2 कम्युनिस्ट पक्षाने एकत्र येत येथे सरकार स्थापन केलं होतं. त्यामध्ये पंतप्रधानपदाबाबत समान कार्यकाळ ठरला आहे. आता केपी ओली यांच्या पक्षातही त्यांच्या विरोधात नेते पुढे येत आहे. पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा देण्याची मागणी देखील आता होऊ लागली आहे.


नेपाळने भारतातील कालापानी, लिपुलेख और लिम्पियाधुरा हे 3 भाग आपल्या नव्या नकाशात नेपाळमध्ये दाखवले. 8 मेला भारताने उत्तराखंडसाठी लिपुलेख ते कैलाश मानसरोवरसाठी एका रस्त्याचं उद्घाटन केलं. यावर नेपाळने आक्षेप घेतला. यानंतर ओली सरकारने नवा नकाशा जाहीर केला.