मुंबई : भारतात दुसऱ्या लाटेच्या कहरानंतर जगभरात भारतातील व्हायरसबाबत भीती व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा डेल्टा वेरियंट (Corona Delta Variant) अतिक घातक असू शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. डेल्टा वेरियंटचे काही रुग्ण महाराष्ट्रात देखील आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे. डेल्टा व्हायरसबाबत चिंता कायम असतानाच आता नवा वेरियंटने चिंता वाढवल्या आहेत. कोरोनाचा या नव्या वेरियंटचं नाव 'लॅम्ब्डा वेरियंट' (Lambda Variant) आहे. आरोग्य संघटनांनी या व्हायरसबाबत गंभीर इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHO ने देखील कोरोनाच्या लॅम्ब्डा वेरियंट (Lambda Variant) ला 'वेरियंट ऑफ इंटरेस्ट' रुपात वर्गीकरण केलं आहे. 15 जूनला डब्ल्यूएचओने 29 देशांमध्ये 'लॅम्ब्डा वेरियंट' मिळाला आहे. या वेरियंटचा संसर्ग दक्षिण अमेरिकेतून सुरु झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आता दक्षिण ब्राझील ते ब्रिटेनपर्यंत तो पसरला आहे. न्यूज मेडिकल लाइफ साइंसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटलं आहे की, कोरोनाचं हे रूप (Corona Variant) वेगाने UK मध्ये पसरत आहे. इंग्लंडमध्ये या व्हायरसबाबत चिंता व्यक्त केल्या जात आहेत.


29 देशांमध्ये Lambda Variant चा संसर्ग 


ब्रिटेनमध्ये लॅम्बडा वेरियंट (Lambda Variant) चे प्रकरण ऑगस्ट 2020 मध्ये समोर आले होते. त्यानंतर आतापर्यंत 29 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. वैज्ञानिकांच्या मते, कोरोनाच्या या वेरियंटमध्ये स्पाइक प्रोटीनमध्ये अनेक म्यूटेशन दिसले आहेत. ज्यामुळे याची ट्रांसमिसिबिलिटी वाढल्याची पुष्टी होते. पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHI) ने 23 फेब्रुवारी ते 7 जून पर्यंत लॅम्ब्डा वेरियंटचे 6 प्रकरणाची सूचना दिली होती. यावर ही संशोधन सुरु आहे.


Lambda Variant लक्षण


ब्रिटेनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) ने लॅम्बडा वेरियंटच्या लक्षणांची एक यादी तयारी केली आहे. या व्हायरसमुळे ताप, खोकला, चव जाणे, गंध न येणे अशी लक्षणं दिसतात. पण वॅक्सीनचा डोस यावर प्रभावी असल्याचं देखील वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.