आफ्रिकेमध्ये विचित्र आजाराचा फैलाव, माणसाचा तडकाफडकी अंत
टांझानियामध्ये अज्ञात आजाराची साथ आली आहे.
मुंबई : टांझानियामध्ये अज्ञात आजाराची साथ आली आहे. रक्ताची उलटी होऊन तडकाफडकी अंत होत असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जगभरात कोरोनाची साथ असताना आणखी एका आजाराची भीती परसरली आहे. आफ्रिकेतल्या टांझानियामध्ये रक्ताच्या उलट्या होऊन 15 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे तर या विचित्र आजाराची आणखी किमान 50 जणांना बाधा झाल्याचं समोर आलं आहे. मेया शहरातील एका भागामध्ये ही साथ पसरली असली तर त्यामुळे जगभरात घबराट पसरली आहे.
टांझानियाचं सरकार मात्र ही फारशी गंभीर बाब नसल्याचं म्हणतं आहे. पाण्यातील प्रदुषण किंवा अन्य कोणत्यातरी कारणांमुळे हे झालेलं असू शकतं असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ही घटना घडली, त्या ठिकाणी तज्ज्ञांचं पथक रवाना करण्यात आलं आहे. आजाराच्या कारणांचा शोध घेतला जातो आहे. त्याच वेळी मेया शहरातील वैद्यकीय अधिकारी फेलिस्ता किसांदू यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांनी सर्वप्रथम या आजाराबाबत माहिती फोडली होती.
आजाराबाबत अफवा पसरवल्याचा आणि त्यामुळे घबराहट निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. हा आजार संसर्गजन्य नसल्याचा दावा टांझानियाच्या आरोग्य मंत्रालयानं केला असला तरी कोरोनाच्या दुधामुळे तोंड पोळल्यानंतर आता ताकही फुंकून प्यायलेलं बरं...