नवा शोध : प्लास्टिक नष्ट करून प्रदूषणाला बसणार आळा
पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी एक नवा शोध लावलाय. यामुळे पर्यावरण प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.
सिडनी : पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी एक नवा शोध लावलाय. यामुळे पर्यावरण प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रदूषण निर्माण करणार प्लास्टिक नष्ट होणार आहे. पॉलीथीन टेरिफ्थेलैट (पीईटी ) ने बनलेल्या कोटी टन बॉटल्सचे रिसायकल होण शक्य झालय. त्यामूळे प्लास्टिक बॉटल आपल्या वापरानंतरही शेकडो वर्षे पर्यावरणाचा हिस्सा बनून राहू शकतात. ब्रिटेनचे पोर्ट्समाउथ विश्वविद्यालय आणि अमरीका ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय अक्षय ऊर्जा प्रयोगशाळेत ( एनआरईएल ) संशोधकांनी याचा अभ्यास करत कार्यप्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न केला.
शोधामध्ये सुधारणा
जपानच्या रिसायकल केंद्रात प्लास्टिक खाणाऱ्या प्राकृतिक जिवाणुचा शोध घेताना वैज्ञानिकांना याचा शोध लागला.औद्योगिक स्तरावर याचा उपयोग प्लास्टिक नष्ट करण्यासाठी केला जावा यासाठी या शोधामध्ये अधिकाधिक सुधारणा करण्यात येणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.