श्रीलंकेचे भवितव्य ठरवणारा आजचा महत्त्वाचा दिवस, नव्या राष्ट्रपतींची निवड होणार
New Sri Lanka president to be elected Today : श्रीलंकेचं भवितव्य ठरवणारा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. श्रीलंकेत आज राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे.
अमित भिडे / कोलंबो : New Sri Lanka president to be elected Today : श्रीलंकेचं भवितव्य ठरवणारा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. श्रीलंकेत आज राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. श्रीलंका संसदेत 225 खासदार प्रेफरेन्शिअल व्होटिंग करुन राष्ट्राध्यक्ष निवडतील. श्रीलंकेत रनिल विक्रमसिंघे यांना डलास अलाहापेरूमा, अनुराकुमारा दिसनायके यांनी आव्हान दिले आहे.
कोणत्याही परिस्थितीत विक्रमसिंघे सत्तेवर येता कामा नयेत नाही तर आंदोलन सुरूच ठेऊ असा इशारा आरगलया चळवळीने दिला आहे. संसदेत विक्रमसिंघे यांना राजपक्षेंच्या एसएलपीपी पार्टीने पाठिंबा दिला असला तरी एसएलपीपीचेच ज्येष्ठ खासदार अलाहापेरुमा यांनीही या निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यांना एसएलपीपीमधून किती खासदार मत देतात याची उत्सुकता आहे.
तसेच विरोधी पक्ष एसजेबीनेही अलाहापेरूमा यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे विक्रमसिंघे आणि अलाहापेरूमा यांच्यात टफ फाईट असणार आहे. अलाहापेरूमा विजयी झाल्यास विद्यमान विरोधी पक्षनेते सजित प्रेमदासा पंतप्रधान होतील.
आज श्रीलंकेच्या नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. रानिल विक्रमसिंघे, डल्लास अल्हाप्पेरुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके या तिघांमध्ये राष्ट्रपती पदासाठी लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता निवडीची प्रक्रिया सुरु होईल. दुपारी 4 वाजेपर्यंत निकाल हाती येईल. महगाईविरोधातील जन आंदोलनानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळाले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.