Rishi Sunak: पसारा घालणारी बायको अन् पंतप्रधान नवरा... प्रेमात सगळं काही माफ असतं!
स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए पुर्ण केलं. त्याचवेळी त्यांची भेट अक्षता मुर्ती यांच्यासोबत झाली. मग काय... सुरू झाली (Rishi Sunak and Akshata Murty Love story) लवस्टोरी...
Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस (Liz Truss) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक पुढील पंतप्रधान असणार (New UK PM Rishi Sunak) आहेत. ऋषी सुनक यांच्यासमोर आणि पेनी मॉर्डंट यांचं आव्हान होतं. मात्र, पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्यानं ऋषी सुनक नवे पंतप्रधान झाले आहेत. ऋषी सुनक म्हणजे इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांचे जावई... नारायण मुर्ती (Narayan Murthy) यांची कन्या अक्षता मुर्तीने (Akshata Murthy) 2009 साली ऋषी सुनक यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर आता अक्षता आणि ऋषी सुनक यांची लव स्टोरी (Million Dollar Love Story) चर्चेचा विषय आहे.
ऋषी सुनक यांचे आजी आजोबा हे मुळचे पंजाबचे होते. मात्र, ऋषी सुनक यांचा जन्म पुर्व अफ्रिकेत झाला. 12 मे 1980 साली ऋषी सुनक यांचा जन्म झाला. वडिल यशवीर आणि उषा असं आईचं नाव... आजी आजोबा 1960 च्या दशकात पुर्व आफ्रिकेत स्थलांतरीत झाले. त्यानंतर ऋषी सुनक यांच्या आई वडिलांनी ब्रिटनमध्ये आपलं बस्तान बसवलं. ऋषी यांचे वडील ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये काम करत होते. तर त्यांच्या आई फार्मसी चालवत होत्या.
सुनक यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रची पदवी धारण केली. तर विचेंस्टर कॉलेजमधून तत्वज्ञान आणि राज्यशास्त्राची पदवी देखील पुर्ण केली. त्यानंतर त्यांनी एमबीए करण्याचा निर्णय घेतला. स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए पुर्ण केलं. त्याचवेळी त्यांची भेट अक्षता मुर्ती यांच्यासोबत झाली. मग काय... सुरू झाली (Rishi Sunak and Akshata Murty Love story) लवस्टोरी...
स्टॅनफर्ड विद्यापीठात दोघं एकत्र शिकत होते. कॉलेजच्या काळात अक्षताच्या जवळ बसायला मिळावं, यासाठी ऋषी सुनक त्यांचे विषय बदलून घेतले. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. एका मुलाखतीत ऋषी सुनक यांनी आपल्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं होतं.
काय म्हणाले होते Rishi Sunak ?
मला टापटीप आणि शिस्त फार आवडते. तर अक्षताचा स्वभाव माझ्यापेक्षा पुर्ण वेगळा आहे. ती जास्त उत्सफुर्त असते. तिचे कपडे कुठेही पडलेली असतात. तसेच चपल... चपलांचं तर विचारूच नका, असं ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी म्हटलं होतं.
पुढे ऋषी सुनक आणि अक्षता मुर्ती यांचं लग्न झालं. 2009 साली दोघांनी लग्नगाठ बांधली. भारताचे स्टार क्रिकेटर अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड देखील यांनी देखील उपस्थिती लावली होती.
आणखी वाचा - Rishi Sunak : ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, भारतीयांचा जगभर डंका!
नारायण मुर्ती यांचे जावई, ऋषी सुनक यांची ब्रिटनमध्ये खुप चांगली प्रतिमा आहे. कोरोना काळात केलेल्या कामामुळे अनेकांनी त्यांनी त्यांचं कौतूक केलं होतं. त्याआधी ते खासदार देखील झाले. अक्षता मुर्ती या फॅशन डिझायनर आहेत. अक्षता डिझाईन्स (Akshata Designs) नावाचा फॅशन लेबल जगप्रसिद्ध आहे. इन्फोसिस कंपनीमध्ये अक्षता यांचे 0.91 टक्के शेअर्स आहेत. तर त्याची एकूण 6 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. तसेच लंडनमधील Catamaran Venture या कंपनीची मालकी देखील अक्षता मुर्ती यांच्याकडे आहे.