न्यूयॉर्क हल्ल्यातील दुसऱ्या अतिरेक्याला शोधण्यात अमेरिकन पोलिसांना यश
न्यूयॉर्क आतंगवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला शोधण्यात अमेरिकेला यश आले आहे.
न्यूयॉर्क : न्यूयॉर्क आतंगवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला शोधण्यात अमेरिकेला यश आले आहे. उज्बेकिस्तानचा असलेली ही व्यक्ती सापडली असल्याची घोषणा अमेरिकेच्या न्याय विभागाने केली आहे. या आतंगवादी हल्ल्यात ८ लोकांचा मृत्यू झाला होता.
एफबीआय ने या ३२ वर्षीय मुखम्मदजोइर कादिरोव च्या फोटोचे पोस्टर प्रदर्शित करून त्यासंबंधित माहिती देण्याचे आवाहन केले होते.
एफबीआय न्यूयॉर्क फिल्ड ऑफिसचे सहाय्यक निर्देशक विलियम स्वीनी यांनी सांगितले की, "पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर १ तासाच्या आत या व्यक्तीचा शोध लागला."