न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. तर न्यूयॉर्क तेथील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरत आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परंतु गेल्या एक महिन्यांपासून मृतांच्या संख्येत घट होत असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेत कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. पण स्टे होम म्हणजेच नागरिकांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे खबरदारीचा उपाय म्हणून न्यूयॉर्क मधील सर्व शाळा यंदाच्या शिक्षण सत्रापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्रयू कुओमो यांनी हा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. यावेळेस त्यांनी राज्यातील सर्व शाळा अधिकाऱ्यांना सांगितले की, राज्यातील प्रत्येक शाळेतील स्वच्छता कशा प्रकारे करता येईल. सोशल डिस्टेंसिंगचे नियम कसे पाळले जातील. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये या सर्व महत्त्वाच्या विषयांवर योजना तयार करण्यात येतील शिवाय काही आठवड्यात त्या लागू करण्यात येतील असं देखील ते म्हणाले. 


शाळेत चालऱ्या कॅफेटेरिया परिसरात सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळने हे देखील एक मोठं आव्हान अधिकाऱ्यांसमोर आहे. मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि समस्येचे निराकरण करण्याच्या अधिक योजनांवर विचार करीत असल्याचे गव्हर्नर एंड्रयू कुओमो यांनी सांगितले आहे.