नवी दिल्ली : अमेरिकेची स्पेस एजेंसी नासाने एक धोक्याचा इशारा दिला आहे. नासाच्या रिपोर्टनुसार एका पिरॉमिडच्या आकाराचा उल्का पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली आहे. हा उल्का अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने पुढे येत आहे. पृथ्वीच्या फार जवळून तो जाणार आहे. पृथ्वीपासून जवळपास 50 लाख किलोमीटर अंतरावर तो जाणार आहे. पण नासा कडून एक धोक्याचा इशारा देखील वर्तवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासाच्या मते, हा एक खूप मोठा दगड आहे जो पृथ्वीच्या खूप जवळून जाणार आहे. पण हा जर पृथ्वीवर पडतो तो शेकडो लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. एक मोठं शहर यामध्ये उद्धवस्त होऊ शकतं. रिपोर्ट्सनुसार हा मोठा उल्कापिंड 20 हजार मील प्रति तासाच्या दिशेने पृथ्वाच्या जवळ येत आहे. या उल्काला एनएफ 23 असं नाव देण्यात आलं आहे. 


नासाच्या मते जर अशा उल्का पृथ्वीच्या दिशेने आल्या तर त्याला रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. हा उल्का न्यूयॉर्क शहारावरुन जाण्याची शक्यता आहे. नासा यावर लक्ष ठेवून आहे. नासा पृथ्वीच्या आजुबाजुला असणाऱ्या अनेक मोठ्या उल्कांवर नजर ठेवून असतात.