नवी दिल्ली : नायजेरियातील एका व्यक्तीने आपल्या वडिलांचं पार्थिव लग्जरीयस बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवलं आणि त्यांना पुरलं. BMW कारमध्ये वडिलांचं पार्थिव ठेवून पुरत असल्याचे फोटोज सोशल मीडियात झपाट्याने व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियातील अनबारा राज्यात राहणाऱ्या एका परिवाराचा हा फोटो आहे.


कफन नाही तर BMW


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्यक्ती आपल्या वडिलांवर खूप प्रेम करत होता आणि त्यांच्या मृत्युनंतर त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली द्यायची त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने 30 मिलियन नायरा (नायजेरियन मुद्राला नायरा म्हणतात) किंमत असलेली बीएमडब्ल्यू कार खरेदी केली. त्यानंतर या लग्जरीयस कारमध्ये आपल्या वडिलांचं पार्थिव ठेवलं आणि पुरलं.


नायजेरियात राहणाऱ्या अजुबुकी याचे वडील इहालगामध्ये राहत होते. वडिलांच्या मृत्युनंतर अजुबुकीने ठरवलं की त्यांना अनोख्या पद्धतीने निरोप द्यायचा. त्यासाठी त्याने लग्जरीयस बीएमडब्ल्यू (जवळपास 60 लाख रुपयांची) कार खरेदी केली आणि या कारमध्ये त्यांना पुरलं.


अजुबुकीने केलेल्या या कृत्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, अनेकजण अजुबुकीने घेतलेल्या या निर्णयावर टीकाही करत आहेत. 


सोशल मीडियावर अनेकजण अजुबुकीवर टीका करत असून त्याने असं करणं चुकीचं आहे. काहींनी म्हटलं की हे कृत्य म्हणजे पैसे वाया घालवणं आहे. जर अजुबुकीकडे इतकेच पैसे आहेत तर त्याने ते पैसे आपल्या वडिलांच्या गावात विकासकामं करण्यासाठी वापरायला हवे होते असं ही एक युजरने म्हटलं आहे.