बर्लिन : प्रसिद्ध होण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. आपल्याला सर्वांनी ओळखाव यासाठी अनेकजण काही ना काही करामती करत असतात तर काही खालच्या पातळीलाही जातात. अशीच एक दुर्देवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरुन नील होएगल हिने १०६ जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे. दुर्देवाची गोष्ट म्हणजे ती एक नर्स आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माणसांना जीवदान देण्याचे काम वैद्यकिय क्षेत्रातील माणसे करत असतात. पण वैद्यकीय पेशाला कलंक लावण्याचे काम जर्मनीतील बर्लिन शहरातील ४१ वर्षाच्या नील हिने केले आहे. जर्मनीतील २ शहरातील एकूण १०६ जणांची हत्या तिने केल्याचे उघड झाले आहे.नील ही १९९९ ते २००५ दरम्यान दोन वेगळ्या रुग्णालयात कामाला होती.


प्रसिद्धीसाठी धडपड


हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या निधनामागे नील हिचा हात असल्याचे समोर आले होते. संशयाची सुई नील हिच्याकडे गेली होती. नील होणाऱ्या रुग्णाांना असे इंजिक्शन देत असे ज्याने त्यांचे ह्रदय कायमचे बंद होत असे. यांचे ह्रदय बंद पडून मृत्यू झाल्यानंतर त्यांना आपण वाचवून प्रसिद्धी मिळवावी यासाठी ती धडपडत होती.


आकडा वाढण्याची शक्यता 


ऑगस्टमध्ये सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार नीलने ९० हत्या केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीत मृतांचा आकडा हा १६ ने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.


तसेच हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.  न्यायालयाने नील हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.