मुंबई : १३,५०० कोटी रूपयांचा घोटाळा करून परदेशात पळणाऱ्या निरव मोदी विरोधात वेस्टमिनीस्टर न्यायालयाने अखेर अटक वॉरंट बजावला आहे. अटक वॉरंटनंतर निरव मोदीला कधीही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, सीबीआयने प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु केली आहे, असे वृत्त सीबीआयचा हवाला देऊन एएनआयने दिले आहे. मात्र निरव मोदीला अटक झालीच तरी त्याला भारतात कधी आणणार हा खरा प्रश्न आहे. विजय माल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी, ललीत मोदी यांनी भारतात हजारो कोटी रूपयांचे घोटाळे करून परदेशात बसस्तान मांडून आहेत. कोट्यवधींची फसवणूक केलेल्यांची यादी तशी खूप मोठी आहे. एकीकडे भारतीय तपास यंत्रणा त्यांच्या प्रत्यार्पणासाठी दिवसरात्र एक करत आहे. तर दुसरीकडे राजकारणी आम्ही निरव मोदीला भारतात आणू, माल्याला आणू, अशी टिमकी मारत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र या मोदी असो की चोक्सी की असो माल्या कोणाचाच अद्याप पत्ता हाती लागलेला नाही. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसे बघितले तर या सगळ्यांना आश्रय घेतलाय इग्लंडमध्ये. इग्लंड सोबत भारयाने आरोपी प्रत्यारपणाचा करार देखील केला आहे. असं असलं तरी प्रत्यक्षात इंग्लंडमधून आरोपी आणंण म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारख आहे. प्रत्यार्पणाची ही प्रक्रिया जटील आहे. आधी भारताला आरोपी विरोधात सबळ पुरावे सादर करावे लागतात. त्यानंतर स्थानिक कोर्टाला पटवून द्यावे लागते की कशा प्रकारे आरोपीने केलेला गुन्हा हा इग्लंडच्या कायद्यानुसार देखील शिक्षेला प्राप्त आहे. एवढे सगळे सोपस्कार पार पाडल्यानंतर कुठे कोर्ट भारताच्या बाजूने निकाल देते. पण कोर्टाने निकाल देऊन भागते कुठले त्यानंतर सुरू होते आरोपींच खरं रडगाणं. सुरुवातीला आरोपी मानवाधिकाराच्या हननचा सहारा घेतात. भारतात आमच्या जिवाला धोका आहे. भारतातली कारागृह रहाण्यायोग्य नसल्याच रडगाणे गातात आणि एकामागोमाग एक अर्ज कोर्टात करत बसतात. या सगळ्यांची पूर्तता करण्यात तपास यंत्रणांचे नाकीनाऊ तर येतातच पण वेळ देखील निघून जातो. त्यामुळे प्रत्यार्पणाची ही प्रक्रीया सोपी करण्याची गरज असल्यात तज्ज्ञांच मत आहे. 


सध्या भारतात निरव मोदीला बजावलेल्या अटक वॉरंटची चर्चा आहे. पण जरी निरव मोदीला अटक झालीच तरी याची काय शाश्वती की तो भारतात येईलच. मानवाधिकाराच रडगाणे गाण्याचे, भारतीय कारागृहांवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे. स्वत:च्या जिवाला धोका असल्याचा आरोप करायचा, असे सगळे पर्याय त्याच्याकडे अजून शिल्लक आहेत त्यामुळे अटकेनंतर निरव मोदी भारतात येतो का पुन्हा त्याच्या इग्लंडमधील महालात रहायला जातो हे बघावं लागेल.