GOOD NEWS : आता येथे नो मास्क, नो सोशल डिस्टन; जगातील हा दुसरा देश
जगभरात कोरोनाचा (Coronavirus) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे.
वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे. इस्त्रायलनंतर आता अमेरिकेत कोरोना काळात मुक्तपणे वावरता येणार आहे. अमेरिकन सरकारने नो मास्क, नो सोशल डिस्टन असे सांगत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे, अशी लोकांची आता कुठेही मास्क न लावता फिरु शकता असे म्हटले आहे. दरम्यान, याआधी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे बंधन घातले होते. तेही बंधन आता मागे घेतले आहे त्यामुळे आता अमेरिकेत नो मास्क, नो सोशल डिस्टन असेच चित्र दिसणार आहे. (Fully vaccinated individuals can resume activities without wearing a mask or staying 6 feet apart: US )
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन पाळणे गरजेच आहे. त्याची सक्ती करण्यात येत आहे. मात्र, इस्त्रायलनंतर आता अमेरिकेत याची सक्ती नाही. मास्क मुक्त देश बनण्याबरोबरच कोरोना दूर ठेवणार दुसरा देश ठरला आहे. लस घेतलेल्यांनी आता कोविडचे नियम पाळण्याची गरज नसल्याचे सीडीसीने म्हटले आहे. लसीचे दोन डोस घेतलेले लोक आता ते त्यांची दररोजची कामे बिनधास्त करु शकतात, असे म्हटले आहे.
दरम्यान, व्यवसायाच्या ठिकाणी तसेच आदिवासी, लोकल बिझनेस, कामाच्या ठिकाणी जिथे मास्क घालणे अनिवार्य असून सोशल डिस्टन्सिंग पाळावे. कामाच्या ठिकाणी तिथे मास्क घालावे लागेल, असे नव्या मार्गदर्शक सूचना करताना म्हटले आहे. तसेच अमेरिकेत फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीला (Corona Vaccine) मान्यता दिली आहे. फायझर-बायोएनटेकने ही कोरोना लस (Pfizer-BioNTech COVID Vaccine) बनविली आहे. ही लस लहान मुलांना दिली जाणार आहे.
याआधी इस्त्रायलमध्ये मास्क मुक्ती
कोरोना व्हायरसचा आज जगात उद्रेक पाहायला मिळत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोना विषाणू 2019च्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातून पसरला. कोरोनाचे संक्रमण मोठ्या वेगाने परसले, की अल्पावधीतच कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतले, तर लाखो लोकांचा बळी गेला. इस्रायलने मास्क न लावण्याचे आदेश दिले आहेत. असा आदेश देणारा इस्रायल हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. इस्रायलमध्ये 81 टक्के लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. यानंतर येथील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर येथील लोकांनी चेहऱ्यावरील मास्क काढलेले दिसून येत आहे. आता हीच परिस्थिती अमेरिकेत दिसत आहे. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.