नोबेल विजेते लेखक वीएस नायपॉल यांचं निधन
नायपॉल यांना १९७२ साली बुकर प्राईज आणि २००१ साली साहित्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
लंडन: साहित्य नोबेल पुरस्कार विजेते आणि सुप्रसिद्ध लेखक व्ही एस नायपॉल यांचं निधन झालं. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी लंडनमधील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. भारतीय वंशाच्या नायपॉल यांचा जन्म १९३२ साली त्रिनिदादमध्ये झाला होता.
साहित्यासाठी नोबेल
त्रिनिदादमध्ये जन्मलेल्या नायपॉल यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. नायपॉल यांना १९७२ साली बुकर प्राईज आणि २००१ साली साहित्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वादग्रस्त लेखण
आपल्या वादग्रस्त लिखाणामुळे व्ही एस नायपॉल अनेकदा चर्चेत आले. त्यांना आपल्या लिखाणामुळे आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळाली. त्यांनी लिहीलेल्या ‘अ बेन्ड इन दि रिव्हर’, ‘दि इनिग्मा ऑफ अराव्हल’, ‘फाईंडिंग दि सेंटर’ या कादंबऱ्यांमध्ये विकसनशील देशांतील प्रत्येक नागिरकाचा संघर्ष पहायला मिळाला. त्यांच्या लिखाणावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. पण, त्याला तितकेच समर्थनही मिळाले.