Noise pollution Effect On Health: माणूस जसा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे त्याचा नकारात्मक प्रभावही माणसाच्या आरोग्यावर होत आहे. एका अहवालानुसार, कार, ट्रेन आणि विमानांमुळं होणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळं मनुष्याचे आयुष्य घटत असल्याचा दावा केला जात आहे. ध्वनी प्रदुषणामुळं आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचा इशारा याआधीही तज्ज्ञांनी दिला होता. 


वाहनांच्या आवाजामुळं आयुष्य घटण्याची भीती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा विभागाने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासानुसार हा दावा करण्यात आला आहे. कार, विमान, ट्रेनच्या आवाजाच्या संपर्कात जे लोक जास्त असतात त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अशा लोकांना झोप कमी येणे, तणाव, डिप्रेशन सारख्या समस्या निर्माण होतात. तर, मधुमेह आणि हृदयविकारासंबंधित आजार होण्याची भीतीही वाढते. इंग्लडच्या एका परिसरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. यावेळी वाहतुकीच्या साधनांमधून येणाऱ्या आवाजाचा लोकांवर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून आले. आवाजाचा प्रभाव मोजण्यासाठी (DLLY)चा वापर करण्यात आला.  त्यानुसार, 2018मध्ये रस्त्यावरील रहदारीमुळं होणारे ध्वनी प्रदूषणामुळं 1 लाख वर्ष, ट्रेनच्या आवाजामुळं 13000 वर्षे आणि विमानाच्या आवाजामुळं 17000 वर्षे कमी होतात, असा शोध संधोशकांनी लावला आहे. 


आजारांची भीती वाढली


इतकंच नव्हे तर, संशोधनकर्त्यांनी म्हटलं आहे की, ध्वनि प्रदूषण होणाऱ्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्ट्रोक, मधुमेह, डिप्रेशनासारख्या आजार होण्याची भीती वाढू शकते. गजबजाट असलेल्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा धोका तीन पटीने वाढण्याची शक्यता आहे. संशोधकांनी म्हटलं आहे की 24 तासांत 50 डेसिबलहून अधिक आवाज हे लोक ऐकतात. त्यामुळं त्यांचं आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. रस्ते परिवहनच्या साधनांमुळं होणारा आवाज तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करतो, असं या अहवालाक स्पष्ट केलं आहे. 


भारतातही ध्वनी प्रदूषणाचा धोका वाढला


अलीकडेच एका संस्थेने भारतातील 15 शहरांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यानुसार शांत आणि निवासी भागात आवाजाची पातळी मंजूर 50 डेसिबलपेक्षा 50 टक्के जास्त आहे. रस्त्यावरील वाहतुकीव्यतिरिक्त, ध्वनी प्रदूषणाच्या इतर स्त्रोतांमधूनही प्रदूषण होत असल्याचे आढळून आले. ध्वनी प्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.