Aliens In America: उत्तरी अमेरिकेत (North America ) पाहायला मिळाला गुलाबी ( Pink Light Beam ) रहस्यमयी प्रकाश. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर ध्रुवावर (North Pole) पाहायला मिळणाऱ्या नॉर्दन लाईट्स (Northen Lights ) सारखा हा प्रकाश नाही. हा प्रकाश वेगाने एखाद्या रॉकेटसारखा पुढे गेला. आता वैज्ञानिक याबाबत अधिक माहिती घेऊन याचा अभ्यास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर अमेरिकेत नुकतंच आकाश अचानक गुलाबी झालेलं पाहायला मिळालं. गुलाबी किरणांचा एक प्रकाशझोत तारकांना छेद देत आकाशाच्या मधून गेलेला पाहायला मिळाला. कायम खगोलीय घटनांचा अभ्यास करणाऱ्यांनी याचा व्हिडीओ देखील बनवला. हे पाहून तुम्हाला हे नॉर्दन लाईट्स आहेत असं वाटेल, मात्र हे नॉर्दन लाईट्स नाहीत. 


STEVE म्हणजे काय? 


उत्तर अमेरिका आणि दक्षिण कॅनडाच्या अवकाशात रविवारी एक अचंबित करणारी घटना घडली. आधी वैज्ञानिकांना हे नॉर्दन लाईट्स असतील असं वाटलं. मात्र तसं नव्हतं. या रहस्यमयी घटनेला खरंतर स्टीव्ह (STEVE) असं बोललं जातं. स्टीव्ह म्हणजेच स्ट्रॉंग थर्मल एमिशन व्हेलॉसिटी एन्हान्समेंट (Strong Thermal Emission Velocity Enhancement) असं बोललं जातं. 


STEVE साधारतः गुलाबी रंगाची एक तेजस्वी अशी लाट असते. जायच्या आसपास हिरव्या रंगाचा प्रकाशही दिसतो. नॉर्दन लाईट्स प्रमाणे हा प्रकाश सौर वादळामुळे तयार होत नाही. नक्की हा प्रकाशाचा तेजस्वी झोत कशामुळे तयार होतो याबाबतच नेमकं कारण संशोधकांनाही समजलेलं नाही. आकाशात चमकणारा प्रकाश हा साधारतः दोन पद्धतींमध्ये विभागला जातो. यातील एका प्रकाराला एअरग्लो (Airglow) तर दुसऱ्या प्रकाराला ऑरोरा (Aurora) म्हणून संबोधलं जातं.


महत्त्वाची बाब म्हणजे ऑरोरा (Aurora) ज्याला आपण नॉर्दन लाईट्स या नावाने ओळखतो ते उत्तर ध्रुवावर पहिला जातो.  मात्र वैज्ञानिकांच्या मते अमेरिकेच्या आकाशात दिसलेला प्रकाशझोत हा ऑरोरा (Aurora) नाही. वैज्ञानिकांच्या मते STEVE मध्ये आयन्स (Ions) असतात. हे आयन्स सुपरसॉनिक वेगाने चालतात. हे आयन्स सर्वसाधारणपणे गुलाबी रंगाचे असतात. याच्या आसपास हिरव्या रंगाचा प्रकाश तयार होतो. 


स्टीव्ह चा शोध कसा लागला?


स्टीव्ह (STEVE) चा शोध हा वैज्ञानिकांनी लावलेला नाही. याबाबतचा शोध हा सामान्य नागरिकांनीच लावलाय. 2015-16 मध्ये फेसबुकवर काहींनी अशाच प्रकारच्या प्रकाशाबाबत पाहिलं. यानंतर यावर मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरु झाला. मात्र अजूनही हा प्रकाश  आयनोस्फिअर (Ionosphere) मध्ये कसा प्रवास करतो. याबाबत ठोस माहिती समजल्यास याचा रेडिओ कम्युनिकेशनवर किती प्रभाव होतो हे देखील समजू शकेल. 


north america withness pink steve strong thermal eemission velocity enhancement