नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा सनकी राजा किम जोंगने संपूर्ण जगाला आव्हान दिलं आहे. उत्तर कोरियाने रविवारी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर कोरियाच्या या हायड्रोजन बॉम्ब परीक्षणावर युएनमध्ये बैठक बोलावली गेली होती. त्यानंतर उत्तर कोरिया पुन्हा एकदा मिसाईल परीक्षणाच्या तयारीत आहे.


अमेरिकेने इशारा दिल्यानतंतर देखील उत्तर कोरियाने मिसाईल परीक्षण केलं. त्यामुळे अमेरिकेने सर्व देशांना सूचना देत याबाबत युएनमध्ये बैठक बोलावली गेली.


हायड्रोजन बॉम्ब परीक्षणानंतर दक्षिण कोरियाने सोमवारी लाइव फायर ड्रिल केलं होतं. यामुळे दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या परीक्षण स्थळाला टार्गेट केलं होतं. याबाबतची माहिती दक्षिण कोरियाने जगाला दिली आहे.